
कोरोनाला बळी पडणाऱ्यांमध्ये मधुमेह, रक्तदाब इत्यादी रोग असलेल्यांचे प्रमाण जास्त आहे. या सर्वांना डॉक्टर रोज सकाळी मोकळ्या हवेत तासभर फिरण्याचा व्यायाम करायला सांगतात, त्यांचे आरोग्य उत्तम राहण्यासाठी आवश्यकही आहे. एकीकडे आरोग्याला घातक ठरणारी दारू आठ तास विकायची आणि विकत घ्यायची सोय करण्यात आली असताना आरोग्यासाठी फायदेशीर ठरणाऱ्या एक तासाच्या मॉर्निंग वॉक वर मात्र बंदी कायम ठेवणे चुकीचे आणि अतार्किक आहे.
पुणे : पुणे शहरातील संसर्गजन्य भाग सोडून अन्य भागांत सोमवारपासून लाॅकडाऊन मधून सवलती देण्यात आल्या आहेत. त्यामध्ये जीवनावश्यक वस्तूंच्या दुकानांखेरीज दारू विक्रीच्या दुकानांसह अनेक दुकानांना ठराविक वेळेत व्यवसाय करण्यासाठी परवानगी देण्यात आली आहे. या सर्व ठिकाणी नागरीक लाईन मधे उभे राहून सोशल डिस्टिसिंग पाळून, मास्क घालून व्यवहार करत आहेत. या पार्श्वभूमीवर सकाळच्या फ्रेश हवेत व्यायाम म्हणून मॉर्निंग वॉक करणाऱ्यांना सुध्दा सोशल डिस्टिसिंग पाळण्याच्या आणि मास्क बांधण्याच्या अटींवर परवानगी द्यावी, अशी मागणी सजग नागरिक मंचाने महापालिका आणि पोलीस आयुक्त यांच्याकडे केली आहे.
ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप
पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा
कोरोनाला बळी पडणाऱ्यांमध्ये मधुमेह, रक्तदाब इत्यादी रोग असलेल्यांचे प्रमाण जास्त आहे. या सर्वांना डॉक्टर रोज सकाळी मोकळ्या हवेत तासभर फिरण्याचा व्यायाम करायला सांगतात, त्यांचे आरोग्य उत्तम राहण्यासाठी आवश्यकही आहे. एकीकडे आरोग्याला घातक ठरणारी दारू आठ तास विकायची आणि विकत घ्यायची सोय करण्यात आली असताना आरोग्यासाठी फायदेशीर ठरणाऱ्या एक तासाच्या मॉर्निंग वॉक वर मात्र बंदी कायम ठेवणे चुकीचे आणि अतार्किक आहे. त्यामुळे सोशल डिस्टिसिंग पाळून, मास्क बांधून मॉर्निंग वॉक करण्यास ( संसर्गजन्य विभाग सोडून) परवानगी द्यावी, असे मंचाचे अध्यक्ष विवेक वेलणकर यांनी आयुक्त यांच्याकडे केली आहे.
पुणेकर कन्फ्यूज; सरकार म्हणतंय दुकानं सुरू, व्यापाऱ्यांची वेगळीच भूमिका