नागरिकांच्या पुढाकाराने टीपी स्कीम राबविणार

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 20 सप्टेंबर 2019

नागरिकांच्या पुढाकारातून नगररचना (टीपी स्कीम) राबविण्याचा निर्णय पुणे महानगर क्षेत्रविकास प्राधिकरणाने (पीएमआरडीए) घेतला आहे. त्यासाठी किमान शंभर एकरावरील क्षेत्र असलेल्या नागरिकांनी एकत्र येऊन नगररचना योजना राबविण्याची तयारी दर्शविल्यास पीएमआरडीए त्यास मान्यता देणार आहे.

सध्याच्या कार्यपद्धतीनुसार पीएमआरडीएकडून नगररचना योजना राबविण्यासाठी पुढाकार घेतला जातो. जागानिश्‍चिती, भूसंपादन करण्यापासूनची सर्व प्रक्रिया पीएमआरडीएकडून केली जाते. पारदर्शकपणे ही योजना राबविली जात आहे की नाही, अशी शंका नागरिकांकडून व्यक्त केली जाते. त्यातून वाद निर्माण होतात आणि अनेकदा योजना पूर्ण होण्यास मोठा कालावधी लागतो. हे ओळखून पीएमआरडीएने अशा नगररचना योजना राबविण्यासाठी लोकांनीच पुढाकार घ्यावा, यासाठी ही योजना सुरू केली आहे.

पीएमआरडीएचे आयुक्त विक्रम कुमार म्हणाले, ‘‘नगररचना योजनेचे महत्त्व नागरिकांना कळावे, हादेखील यामागे एक उद्देश आहे. परंतु, त्यासाठी किमान शंभर एकर व त्यापेक्षा अधिक क्षेत्र असले पाहिजे. नागरिकांनी एकत्रित येऊन पीएमआरडीएला ही योजना राबविण्यासाठी विनंती केल्यास आम्ही ते राबविणार आहे. त्यामुळे योजनाही गतीने मार्गी लागण्यास मदत होईल.’

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Citizens initiative will implement TP scheme PMRDA