esakal | Ganeshotsav 2020 : यंदा फुलांनी खाल्ला 'भाव'; हात राखूनच पुणेकरांनी केली खरेदी
sakal

बोलून बातमी शोधा

Pune_Flower_Market

आरास करण्यासाठी मोठ्या प्रमाणावर फुलांची खरेदी केली जाते. फुलांचा बाजारही तेजीत असतो. परंतु यंदा कोरोनाचा प्रभाव त्यावर स्पष्ट पाहायला मिळाला.

Ganeshotsav 2020 : यंदा फुलांनी खाल्ला 'भाव'; हात राखूनच पुणेकरांनी केली खरेदी

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

Ganesh Festival 2020 : पुणे : गणेशोत्सव आणि हरितालीकेच्या पुजेसाठी फुलांची खरेदी करायला नागरिक घराबाहेर पडले खरे, परंतु कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर त्यांनी हात राखूनच खरेदी केल्याचे चित्र पाहायला मिळाले. लॉकडाउनमुळे शेतकऱ्यांनी फुलांच्या लागवड टाळल्यामुळे फुलांचे भाव यंदा चढेच पाहायला मिळाले. 

यंदा पुण्यानं घेतली आघाडी; स्वच्छ शहरांच्या यादीत पुणे 'टॉप-२०'मध्ये!​

गणेशोत्सव म्हटलं की, आरास करण्यासाठी मोठ्या प्रमाणावर फुलांची खरेदी केली जाते. फुलांचा बाजारही तेजीत असतो. परंतु यंदा कोरोनाचा प्रभाव त्यावर स्पष्ट पाहायला मिळाला. काहीसे भीतच नागरिकांनी खरेदी केल्याचे दिसत होते. तसेच, छोटे विक्रेतेही हात राखूनच माल उचलत आहे. मात्र, मागील काही दिवसांच्या तुलनेत गुरुवारी झेंडू, शेवंती, गुलाब आदी फुलांना मागणी वाढल्याचे पाहायला मिळाले. हरितालिकेच्या पूजेसाठी गरजेपुरती फुलांची खरेदी करताना नागरिक दिसले. दुपारनंतर फुलांचे भाव काहीसे कमी झाल्याचे पाहायला मिळाले.

अखेर 'पीएमपी'चा मुहूर्त ठरला; 'या' तारखेपासून बस रस्त्यावर धावणार!​

सार्वजनिक गणेशोत्सवावर निर्बंध असल्यामुळे मंडळांच्या मोठ्या खरेदीवर परिणाम झाला आहे. तसेच, आवकही काहीशी कमी दिसते. नागरिक फुलांच्या खरेदीसाठी येत आहे. परंतु, कोरोनामुळे त्यांनी मर्यादित स्वरूपातच खरेदीला प्राधान्य दिले आहे. 
- अरुण वीर, अध्यक्ष, अखिल पुणे फुले बाजार अडते असोसिएशन. 

मागील काही दिवसांच्या तुलनेत फुलांची खरेदी वाढली आहे. परंतु, दरवर्षी प्रमाणे खरेदी यंदा दिसत नाही. फुलांचे बाजारही वाढले आहेत. कोरोनाचा परिणाम फूल विक्रेत्यांवरही मोठ्या प्रमाणावर झाला आहे. 
- इक्‍बालभाई फुलवाले 

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

(Edited by : Ashish N. Kadam)

loading image
go to top