पुणे जिल्ह्यात चक्रीवादळाच्या संकटासाठी या आहेत उपयोजना  

सकाळ वृत्तसेवा
Tuesday, 2 June 2020

 चक्रीवादळ व अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर पुणे जिल्ह्यात विशेष खबरदारी घेतली जात आहे.

 पुणे : चक्रीवादळ व अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर पुणे जिल्ह्यात विशेष खबरदारी घेतली जात आहे. जुन्नर व आंबेगाव तालुक्यातील नागरिकांनी 3 व 4 जून रोजी घरातच सुरक्षित रहावे, शक्यतो घराबाहेर पडू नये, असे आवाहन केले आहे. वेल्हे तालुक्यातील तहसील कार्यालयात चोविस तास आपत्ती व्यवस्थापन कक्ष सुरु राहणार आहे. भोर येथील पंचायत समिती सभागृहात आपत्ती व्यवस्थापन समितीची अतितातडीची बैठक घेण्यात आली.  

कोरोनाला हरविण्यासाठी काय पण, बारामतीत आजोबांकडून रक्तदान  

जुन्नर : जुन्नर व आंबेगाव तालुक्यातील नागरिकांनी 3 व 4 जून रोजी घरातच सुरक्षित रहावे, शक्यतो घराबाहेर पडू नये, असे आवाहन सहायक जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी केले आहे. जुन्नर व आंबेगाव हे दोन्ही तालुके चक्री वादळाच्या दक्षता क्षेत्रात येत आहेत. त्यामुळे आपत्ती व्यवस्थापनाच्या दृष्टिकोनातून करावयाच्या उपाययोजनांबाबत दोनही तालुक्यातील अधिकाऱ्यांची संयुक्त बैठक आज दुपारी घेण्यात आली. भूस्खलन व महापूर येण्याची शक्यता गृहीत धरून तालुका पातळीवर संबंधित अधिकाऱ्यांनी विशेष खबरदारी घ्यावी. नागरिकांनी 3 व 4 जून रोजी घरातच सुरक्षित रहावे, शक्यतो घराबाहेर पडू नये, अशी सूचना त्यांनी या वेळी केली. 

पुण्याच्या इतर बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

दरम्यान, गेले दोन दिवस आकाश ढगाळलेले असून, पावसाळी वातावरण निर्माण झाले आहे. काही ठिकाणी जोराचा व तुरळक पाऊस झाला आहे. शेतकरी आपला कांदा व अन्य शेतमाल सुरक्षित ठेवण्यासाठी धावपळ करत आहे. सोशल मीडियावर देखील याबाबत जागृतीचे संदेश दिले जात आहेत.

शिरूरमध्ये वडिल व मुलाचा विजेचा धक्क्याने मृत्यू  

वेल्हे : वेल्हे तालुका आपत्ती व्यवस्थापन समिती व सर्व खातेप्रमुखांची वेल्हे तहसील कार्यालय 
येथे आज बैठक घेण्यात आली. त्यात आपत्तीबद्दल सविस्तर माहीती देण्यात आली. कच्ची घरे, पत्र्याची घरे, पत्र्याचे शेड, अशा ठिकाणी असलेल्या लोकांची सोय मंदिरांमध्ये, शालेय इमारतीमध्ये,अंगणवाडी आदी पक्क्या ठिकाणी करण्याच्या सुचना देण्यात आल्या. अनेक ठिकाणी झाडे, विजेच्या तारा, कोसळण्याची शक्यता आहे. त्यामुळे या ठिकाणी नागरिकांनी काळजी घेणे गरजेचे आहे. सर्व शासकीय कर्मचा-यांनी आपआपल्या गावात थांबून 

आदिवासी महिलांच्या चेहऱ्यावरील हसू सांगतय, डोक्यावरील हंडा उतरल्याचे सुख

याबाबत जनजागृत्ती करणे गरजेचे असल्याचे सांगितले. या वेळी सभापती दिनकर सरपाले, जिल्हा परीषद सदस्य अमोल नलावडे, दिनकर धरपाळे, गटविकास अधिकारी विशाल शिंदे, सहायक पोलिस निरीक्षक विनायक देवकर, तालुका वैद्यकीय अधिकारी डॅा.अंबादास देवकर, सार्वजनिक बांधकाम विभागाच्या उपअभियंता आश्विनी घोडके, वनक्षेत्रपाल आय. जी. मुलाणी, विस्तार अधिकारी सुनील मुगळे उपस्थित होते. 

पुरंदरमध्ये कोरोनाचा पहिला बळी

आरोग्य सुविधेसाठी पानशेत व वेल्हे या ठिकाणी दोन रुग्णवाहिकेची सोय करण्यात आली आहे. रस्त्यावर दरडी झाडे कोसळल्यास जेसीबी,ट्रॅक्टरची,वुडकटर मशिनची सोय केली आहे. सरपंच, पोलिस पाटील, ग्रामसेवक, तलाठी यांनी नागरिकांना आवश्यक असल्यास सुरक्षित ठिकाणी हलवण्याच्या सूचना करणार आहे. वेल्हे तहसील कार्यालयात आपत्ती व्यवस्थापन चोविस तास कक्ष सुरु केला असून, 02130-221223 किंवा भ्रमणध्वनी
7066429401 या क्रमांकावर संपर्क करावा. 

भोर : भोर तालुक्यात वादळी वारे आणि अतिवृष्टीमुळे होणारे नुकसान टाळण्यासाठी अधिकाऱ्यांनी सतर्क राहावे, अशी सूचना प्रांताधिकारी राजेंद्रकुमार जाधव यांनी दिली. भोर येथील पंचायत समिती सभागृहात आपत्ती व्यवस्थापन समितीची अतीतातडीची बैठक घेण्यात आली. त्यावेळी ते बोलत होते.

या बैठकीस तहसीलदार अजित पाटील, गटविकास अधिकारी विशाल तनपुरे, पोलिस निरीक्षक राजू मोरे, नगरपालिकेचे मुख्याधिकारी विजयकुमार थोरात, महावितरणचे उपअभियंता संतोष चव्हाण, सार्वजनिक बांधकाम विभागाचे दत्तात्रेय ठाणगे, वन विभागाचे दत्तात्रेय मिसाळ आदींसह इतर विभागांचे प्रतिनिधी उपस्थित होते.

जाधव म्हणाले, भोरचा परिसर हा कोकणाला लागून असल्यामुळे निसर्ग चक्रीवादळाचा तडाखा बसण्याची शक्यता असल्याने तहसील कार्यालयात २४ तास कार्यरत आपत्ती व्यवस्थापन कक्ष सुरू केला आहे. प्रशासनाने उपाययोजना म्हणून धोकादायक गावे, इमारती, डोंगर व रस्ते आदींची यादी तयार केली आहे. संबंधीत यंत्रणेला आणि व्यक्तींना याबाबत नोटीस देवून सूचित करण्यात आले आहे. तसेच, अत्यावश्यक वेळी हव्या असलेल्या जेसीबीसाठी तालुक्यातील जेसीबीचालकांची यादी तयार ठेवली आहे. तालुक्यातील सर्व विभागांच्या अधिकाऱ्यांना मुख्यालयातच राहण्याच्या सूचनाही देण्यात आल्या आहेत. आपत्ती व्यवस्थापन कक्ष दूरध्वनी क्रमांक - (०२११३)२२२५३९. 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Citizens of pune district, do not go out for two days