पुण्यातील नागरिकांना ऑक्‍टोबर हीटच सामना करावा लागणार

सकाळ वृत्तसेवा
Thursday, 1 October 2020

पुणे शहरातील कमाल तापमानात गेल्या काही दिवसांपासून सातत्याने वाढ होत आहे. नागरिकांना आता ऑक्‍टोबर हीटच सामना करावा लागणार असल्याचे यातून दिसत आहे. बुधवारी शहरातील कमाल तापमान सरासरीच्या तुलनेत 1.4 अंश सेल्सिअसनेने वाढलेले, म्हणजे 31.9 अंश सेल्सिअस होते. तर लोहगाव येथे सर्वाधिक 32.1 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली.

पुणे - शहरातील कमाल तापमानात गेल्या काही दिवसांपासून सातत्याने वाढ होत आहे. नागरिकांना आता ऑक्‍टोबर हीटच सामना करावा लागणार असल्याचे यातून दिसत आहे. बुधवारी शहरातील कमाल तापमान सरासरीच्या तुलनेत 1.4 अंश सेल्सिअसनेने वाढलेले, म्हणजे 31.9 अंश सेल्सिअस होते. तर लोहगाव येथे सर्वाधिक 32.1 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

तापमानात जरी वाढ होत असली, तरी पुढील काही दिवस तुरळक ठिकाणी हलक्‍या स्वरूपाच्या पावसाची शक्‍यता हवामान खात्याने वर्तवली आहे. राज्यातही अशीच स्थिती राहील. मागील काही दिवसांपासून शहरात पावसाने घेतलेली विश्रांती आणि निरभ्र यामुळे तापमानात वाढ झालेली पहायला मिळत आहे. 

पुण्यातील उद्याने, बागा केव्हा होणार सुरू? जाणून घ्या

मान्सून परततोय... 
मान्सूनचा परतीचा प्रवास सुरू झाला असून, आत्तापर्यंत राजस्थानचा काही भाग, हरियाना, पंजाब, पश्‍चिम हिमालयातून त्याने माघार घेतलीआहे. पुढील दोन ते तीन दिवसात उत्तरप्रदेश, राजस्थानच्या काही भागातून माघार घेईल. मंगळवारी (ता.29) देशभरात सरासरी पेक्षा नऊ टक्के जास्त पाऊस पडल्याचे हवामान खात्याने कळवले आहे.

डॉक्‍टरांना मारहाण करणाऱ्या पाच जणांवर गुन्हा दाखल  

पुण्यातील सरासरी कमाल तापमान -
दिवस - तापमान (अंश सेल्सिअस) 

शनिवार - 29.3 
रविवार - 30.7 
सोमवार - 30.8 
मंगळवार - 31.1 
बुधवार - 31.9

Edited By - Prashant Patil


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: citizens of Pune will have to face the October heat