esakal | पुण्यातील उद्याने, बागा केव्हा होणार सुरू? जाणून घ्या
sakal

बोलून बातमी शोधा

garden.jpg

पुण्यात लॉकडाउनमुळे गेली सहा महिने बंद असलेली उद्याने-बागांची दारे उघडण्याचा निर्णय आता पुन्हा लांबणीवर पडला असून, नागरिकांसाठी सर्व उद्याने सुरू करण्याबाबत चर्चेकरिताची नियोजित बैठक न झाल्याने हा निर्णय थांबला आहे.

पुण्यातील उद्याने, बागा केव्हा होणार सुरू? जाणून घ्या

sakal_logo
By
सकाळवृत्तसेवा

पुणे : पुण्यात लॉकडाउनमुळे गेली सहा महिने बंद असलेली उद्याने-बागांची दारे उघडण्याचा निर्णय आता पुन्हा लांबणीवर पडला असून, नागरिकांसाठी सर्व उद्याने सुरू करण्याबाबत चर्चेकरिताची नियोजित बैठक न झाल्याने हा निर्णय थांबला आहे. मात्र कोरोनाचा संसर्ग आणि त्याचे परिणाम जाणूनच उद्यानांसंदर्भात भूमिका जाहीर केली जाणार असल्याचे महापौर मुरलीधर मोहोळ यांनी बुधवारी स्पष्ट केले. परिणामी, उद्याने सुरू होणार की नाही ? याची उत्सुकता आहे. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा


लॉकडाउनच्या पहिल्या टप्प्यापासून बंद असलेली उद्याने सुरू करण्याच्या हालचाली महापालिकेच्या आहेत. त्यासाठी काही बंधने घालून ती उघडण्याच्या तयारी महापालिका प्रशासनाची आहे. मात्र, उद्याने उघडल्यास ज्येष्ठांसह लहान मुलांना प्रवेश नसेल, असेही सांगण्यात येत आहे. उद्याने सुरू करण्याबाबत मंगळवारी (ता. 29) महापौर मुरलीधर मोहोळ यांच्यासमवेत बैठक होणार असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले होते. परंतु ही बैठक झालेली नाही. 

वाघोलीतील विकासकामांना निधी द्या; वाचा, कोणी केली मागणी?

कोरोनाच्या साथीत विविध भागांमधील 190 उद्याने बंद करण्यात आली आहेत. मात्र, नागरिकांच्या सोयीसाठी तीन-सव्वातीन महिन्यांपूर्वी ती सुरू करण्याच्या हालचाली तत्कालीन आयुक्त शेखर गायकवाड यांनी केल्या होत्या. परंतु, उद्यानांत गर्दी होऊन कोरोनाचा संसर्ग वाढण्याच्या शक्‍यतेने उद्याने बंदच ठेवण्याची भूमिका महापौर मुरलीधर मोहोळ यांनी घेतली होती. उद्यानात ज्येष्ठ आणि लहान मुले येतात, याकडे लक्ष वेधत मोहोळ यांनी उद्यानांबाबतचा निर्णय मागे घेण्यास प्रशासनाला भाग पाडले होते. दरम्यान, आता शहरातील बहुतांशी व्यवहार सुरू झाले आहेत. त्यामुळे उद्याने उघडण्याची मागणी नागरिकांकडून केली जात आहे. त्यावर निर्णय घेण्यासाठी बैठक होणार असल्याचे आयुक्त विक्रम कुमार यांनी सांगितले. 

राजसाहेबांच्या भेटीने मनसैनिकांना दहा हत्तींचे बळ

मैदानांवरील सरावासाठी होणार चर्चा 
उद्यानांसोबत विविध क्रीडाप्रकारांच्या सरावासाठी मैदानांवर प्रवेश दिला जाण्याबाबत महापालिका सकारात्मक आहे. यासंदर्भातही बैठकीत चर्चा होणार असून, मैदानांवर येणाऱ्यांसाठी काही मर्यादा ठेवण्यात येतील, असेही महापालिका आयुक्त विक्रम कुमार यांनी स्पष्ट केले.  

loading image