अॅम्बुलन्सच्या ड्रायव्हरांविरोधात नागरिकांच्या तक्रारींचा पाऊस; काय आहेत कारणं?

Ambulance
Ambulance
Updated on

पुणे : प्रतिबंधित क्षेत्रात पोलिसांकडून रस्त्यावर पत्रे ठोकताना पर्यायी रस्ते दिलेले असूनही केवळ रस्त्यावर पत्रे आहेत, इतकेच कारण पुढे करीत रुग्णवाहिका चालकांकडून रुग्णाला दवाखान्यात पोचविण्यास टाळाटाळ करत असल्याच्या तक्रारी नागरीकांकडून केली जात आहे. डॉक्टरांऐवजी रुग्णवाहिका चालकच अनेक प्रश्न विचारतात, त्यानंतर मात्र त्यानंतर फोन बंद करत असल्याचे अनुभव नागरिकांना अनुभव येत असल्याचे वास्तव आहे.

हृदयविकाराचा त्रास होणाऱ्या रुग्णाच्या कुटुंबीयांनी रुग्णवाहिकेला बोलावूनही रुग्णवाहिका आली नाही, त्यामुळे खासगी वाहनाने त्यास रुग्णालयात पोचविले, मात्र 'गोल्डन अवर"मध्ये पोचू न शकल्याने नागरिकाचा मृत्यू झाल्याची घटना शहरात घडली. याबाबतचे वृत्त शुक्रवारी 'सकाळ'मध्ये प्रसिद्ध झाले. या प्रकारामुळे रुग्णवाहिका सेवा देणाऱ्या कंपन्या, रुग्णवाहिका चालक यांच्या मनमानी कारभाराला वाचा फुटली आहे.

पोलिसांकडून प्रतिबंधित क्षेत्रातील मुख्य रस्ते पत्रे ठोकून बंद करण्यात आले आहेत. मात्र या बंद रस्त्यावर अत्यावश्यक सेवेतील रुग्णवाहिकांना आतमध्ये जाण्यासाठी आणि बाहेर पडण्यासाठी पर्यायी मार्ग देखील दिले आहेत. असे असूनही प्रतिबंधित ठिकाणच्या अन्य रुग्णांना घेण्यास रुग्णवाहिका तयार नसल्याची सद्यस्थिती आहे. तसेच रुग्णाला सर्दी, खोकला आहे का, दम लागतो का, त्याची कोरोना टेस्ट केली का? असे प्रश्न विचारुन पुन्हा येत नसल्याची सद्यस्थिती आहे.

याविषयी पुणे पोलिस विघ्नहर्ता न्यासचे विश्वस्त डॉ. मिलिंद भोई म्हणाले, "पोलिसांनी बंद रस्त्यांना पर्यायी रस्ते देऊनही रुग्णवाहिका येत नाहीत. रुग्णवाहिका चालक पर्यायी मार्गांचा शोध घेत नाहीत. त्यामुळे गुरुवारी घडलेल्या घटनेप्रमाणे यापूर्वी देखील रुग्णांना जीव गमवावा लागला आहे."

दरम्यान, गुरुवारी खडकमाळ परिसरातील रुग्णाला आणण्यासाठी 108 या आपत्कालीन वैद्यकीय सेवेची रुग्णवाहिका संबंधीत परिसरात गेली होती, मात्र रस्ते बंद असल्याने त्यांना पुढे जाता आले नसल्याचे 108 सेवेने स्पष्ट केले.

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

"प्रतिबंधित क्षेत्रात मुख्य रस्ते बंद असतात. मात्र रुग्णवाहिकासाठी प्रवेश करण्यास व बाहेर पडण्यास मार्ग आहेत. रुग्णवाहिका चालकांना विनंती आहे, त्यांनी त्यांना मार्ग सापडत नसल्यास पोलिसांची किंवा नागरीकांची मदत घ्यावी, रुग्णाला त्वरित उपचार मिळवून द्यावेत." - डॉ. के. वेंकटेशम, पोलिस आयुक्त 

(Edited by : Ashish N. Kadam)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com