'सारथी' संस्थेबाबत अजित पवारांची स्पष्ट भूमिका; काय म्हणाले पाहा!

सकाळ वृत्तसेवा
Friday, 10 July 2020

मुंबई येथे गुरूवारी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी 'सारथी' संस्थेच्या प्रश्नांवर बैठक घेऊन ८ कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून दिला. त्यानंतर शुक्रवारी (ता.१०) त्यांनी पुण्यात आल्यानंतर 'सारथी'च्या कार्यालयाला भेट दिली.

पुणे : छत्रपती शाहू महाराज यांच्या नावाने चालणाऱ्या 'सारथी' संस्थेचा कारभार हा त्यांच्या नावाला साजेसा असाच असला पाहिजे. कामात कोणत्याही त्रुटी न ठेवता, सर्व माहिती संकेतस्थळावर जाहीर करून, पारदर्शक काम केले पाहिजे, असा सल्ला उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिला. 

बेशिस्तपणामुळे आली पुन्हा लाॅकडाऊनची वेळ; उपमुख्यमंत्र्यांनी दिले स्पष्टीकरण​

मुंबई येथे गुरूवारी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी 'सारथी' संस्थेच्या प्रश्नांवर बैठक घेऊन ८ कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून दिला. त्यानंतर शुक्रवारी (ता.१०) त्यांनी पुण्यात आल्यानंतर 'सारथी'च्या कार्यालयाला भेट दिली. यावेळी राज्याचे माजी मुख्य सचिव अजित निंबाळकर, एमपीएससीचे माजी अध्यक्ष मधुकर कोकाटे, सारथीचे प्रमुख अशोक काकडे, मधुकर दांगट आदी यावेळी उपस्थित होते. 

"काल मुंबईच्या बैठकीत काही निर्णय घेतले आहेत, त्याबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी चर्चा केली आहे. काही निर्णयांबाबत पुढच्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत चर्चा करून निर्णय घेतला जाईल."

Breaking : विद्यार्थ्यांनो, आता 'अशा' होणार परीक्षा; 'यूजीसी'ने जाहीर केली नियमावली!​

एखादी संस्था उभी राहिल्यावर तिचे चांगल्या पद्धतीने काम झाले पाहिजे. विशेष म्हणजे शाहू महाराज यांच्या नावाने संस्था असल्याने त्यास साजेसे काम झाले पाहिजे. कोणाच्याही मनात समज-गैरसमज नको. सर्व निर्णय, संस्थेचा जमा खर्च याची माहिती संकेतस्थळावर टाकली पाहिजे, काम पारदर्शक व्हावे अशी अनेकांची इच्छा आहे. 

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

"आजच्या भेटीत येथील कामकाज कसे चालते याची माहिती घेतली, तसेच आताच्या अधिकाऱ्यांचे व्हिजन काय आहे, कोणत्या योजना राबविण्यात येणार आहेत? याबाबतही माहिती घेतली," असे पवार यांनी सांगितले.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

(Edited by : Ashish N. Kadam)


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Deputy CM Ajit Pawar expressed his views on the management of Sarathi organization