Pune News : निवृत्त सैनिकाचा सत्कार करून नागरिकांनी केला आदर व्यक्त

तीस वर्षे लष्करी सेवा केल्यानंतर चिंतामणी कॉलनी महादेवनगर येथील सुभेदार खंडेराव गोडसे निवृत्त होऊन घरी परतले आहेत.
citizens showed their respect by felicitating retired soldier indian army
citizens showed their respect by felicitating retired soldier indian armySakal

मांजरी : राष्ट्राच्या संरक्षणासाठी आहोरात्र सीमेवर पाहारा देणाऱ्या प्रत्येक सैनिकाबाबत नागरिकांमध्ये कायमच आदराची भावना असते. त्याच्या निवृत्तीनंतरही हा भाव कायम असलेला पाहायला मिळतो. महादेवनगर येथे निवृत्त होऊन आलेल्या सुभेदार खंडेराव गोडसे यांच्याबाबत असाच अभिमान बाळगत येथील नागरिकांनी त्यांचा निवृत्ती सोहळा साजरा करून सैनिकांप्रती असलेला आदर व अभिमान व्यक्त केला.

तीस वर्षे लष्करी सेवा केल्यानंतर चिंतामणी कॉलनी महादेवनगर येथील सुभेदार खंडेराव गोडसे निवृत्त होऊन घरी परतले आहेत. ते कॉलनीत प्रवेश करताच परिसरातील नागरिकांनी त्यांच्यावर पुष्पवृष्टी करून फटाके फोडत त्यांचे उत्साहात स्वागत केले. कृषिउत्पन्न बाजारसमितीचे संचालक सुदर्शन चौधरी, राष्ट्रवादी काँग्रेसचे शहर उपाध्यक्ष प्रशांत घुले, सोरतापवाडीचे माजी उपसरपंच गणेश चौधरी, सुभेदार गोडसे यांचे शिक्षक, नातेवाईक व परिसरातील नागरिक यावेळी उपस्थित होते.

सुभेदार गोडसे यांनी हैदराबाद येथून तोफखाना शिपाई म्हणून सेवेस सुरुवात केली. बिनागुडी, पश्चीम बंगाल, जम्मू, रायवाला, कुपवाडा, डेहराडून, तंगधार, अलवर, मालबाजार, ढाणा, मध्य प्रदेश, सियाचीन गलॅशियर, औरंगाबाद आदी ठिकाणी त्यांनी सेवा दिली. बारामुल्ला शहरातून जाताना अतिरेकी हल्ला झाला त्यावेळी गोळीबार करून त्यांच्यावर मात करण्याच्या थराराचे अनुभवकथन त्यांनी यावेळी केले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com