पुण्यातील नागरिक करतायेत 'अशा' पद्धतीने गणेश मूर्ती खरेदी

सकाळ वृत्तसेवा
Friday, 14 August 2020

खरेदीसाठी सोशल मीडिया हे नागरिकांसाठी महत्त्वाचे माध्यम ठरत आहे. घरपोहच करणाऱ्या शाडूच्या गणेश मूर्तींच्या ऑनलाईन बुकिंगला चांगला प्रतिसाद लाभत आहे.

रामवाडी : कोरोनाचा वाढता धोका लक्षात घेता गर्दी टाळून सण साजरा करण्याकडे नागरिकांचा कल वाढत असून, खरेदीसाठी सोशल मीडिया हे नागरिकांसाठी महत्त्वाचे माध्यम ठरत आहे. घरपोहच करणाऱ्या शाडूच्या गणेश मूर्तींच्या ऑनलाईन बुकिंगला चांगला प्रतिसाद लाभत असल्याने या वर्षी प्रत्यक्ष स्टॉलवर जाऊन गणेश मुर्तींची बुकिंग करण्याकडे काही   नागरिकांनी पाठ फिरवली आहे.

अरे वा, 95 वर्षांच्या आजीबाईंची कोरोनावर मात 

परिसरात कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे या पार्श्वभूमीवर घर पोहच देणाऱ्या  अशा व्हाट्स अँप वर पोस्ट केलेल्या  गणेश मूर्तीची पी डी एफ ओपन करून शाडू माती पासुन बनवलेली  स्वतःला  हवी तशी उंचीची, रंगाची सुबक गणेश मूर्तीचे फोटो पाहुन बुकिंग सध्या पसंदी दिली जात आहे.

दहा दिवसाच्या या गणेश उत्सवात घरात तसेच आजुबाजुच्या  परिसरात ही आनंद, चैतन्य, उत्साह ओसंडून वाहत असतो. पण या वर्षी कोरोनामुळे मार्च महिन्यापासून अनेक सण घरातच  साजरे केले गेले. ज्या गणपती बाप्पाच्या अगमनाची  वर्षभर  प्रत्येक जण आतुरतेने वाट पाहतो तो सण या वर्षी घरातील मंडळीसमवेत साजरा केला जाणार आहे. 

स्वतः बरोबर इतर सदस्यांच्या  आरोग्य विषयक विचार करता यावर्षी  नातेवाईक व मित्रमंडळीची रेलचेल विना हा सण साजरा होणार अशा भावना काही नागरिकांनी या वेळी  व्यक्त  केल्या. ऑनलाईन गणेश मूर्ती बुकिंगला नागरिकांचा मिळणारा प्रतिसाद चांगला असला तरी काही नागरिक प्रत्यक्ष स्टॉलवर जाऊन गणेश मूर्ती खरेदी करण्याकडे धाव घेत असल्याने या वर्षी ऑनलाईन बुकिंग व प्रत्यक्ष स्टॉलकडे जाऊन बुकिंग असा संमिश्र प्रतिसाद मिळत आहे.

शेतकऱ्यांसाठी खूशखबर, दौंडमध्ये मुगाचे दिवसाआड लिलाव

गर्दीत न जाता घरपोहच होणाऱ्या शाडू मातीच्या गणेश मूर्ती बुकिंगला मी प्रथम प्राधान्य दिले. कारण घरात थांबूनही सण साजरा करू शकतो. गणेश मूर्तीचे पूजन तसेच ठरलेल्या दिवशी मूर्तीचे विसर्जन हे घरीच केले जाणार आहे.-डॉ. उषा मोरे, नागरिक

(Edited by : Sagar Diliprao Shelar) 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Citizens tend to book Ganesh idols online