पुण्यातील "त्या" इमारतीत नव्याने सुरु झालेल्या वेश्याव्यवसायामुळे...

सकाळ वृत्तसेवा
Tuesday, 4 August 2020

लॉकडाऊनमध्ये लक्ष्मी रस्त्यावरील एका इमारतीमध्ये नव्याने वेश्याव्यवसाय सुरु करण्यात आला आहे. या प्रकारामुळे स्थानिक नागरीक व व्यापारी अक्षरश: त्रस्त झाले आहेत.

पुणे : लॉकडाऊनमध्ये लक्ष्मी रस्त्यावरील एका इमारतीमध्ये नव्याने वेश्याव्यवसाय सुरु करण्यात आला आहे. या प्रकारामुळे स्थानिक नागरीक व व्यापारी अक्षरश: त्रस्त झाले आहेत. हा प्रकार थांबवुन संबंधीतांवर कारवाई करण्याची मागणी रहिवासी, व्यापारी वर्गाने पोलिस आयुक्ताकडे केली आहे.

पुण्याच्या इतर बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

लक्ष्मी रस्त्यावरील सिटी पोस्टजवळच्या तब्बल सव्वाशे वर्ष जुन्या पुणे जिल्हा मध्यवर्ती बँकेसमोर लक्ष्मी चेंबर्स नावाची 30 वर्ष जुनी इमारत आहे. संबंधीत या इमारतीमध्ये दोन बँका, कार्यालये होती. मात्र कोरोनामुळे लागू केलेल्या लॉकडाऊनमध्ये एका महिलेने इमारतीमधील काही घरे भाडयाने घेऊन तेथे नव्याने वेश्याव्यवसाय सुरु केला आहे.

या प्रकारामुळे स्थानिक रहीवासी त्रस्त झाले आहेत. सर्वसामान्य कुटुंबातील महिलांनाही त्याचा त्रास होऊ लागल्याच्या तक्रारी नागरीक करु लागले आहेत. दरम्यान, संबंधीत इमारत मुख्य बाजारपेठेत व मुख्य रस्त्यावर आहे. तेथेच नव्याने वेश्याव्यावसाय सुरु केला आहे, काही दिवसांनी लक्ष्मी रस्त्यावर संबंधीत महिलांचे प्रमाण वाढेल. त्यामुळे मद्यपी, गर्दूले, चोरटे, गुन्हेगार व उपद्रवी टोळक्यामुळे वावर वाढण्याची शक्यता विजय मारुती चौक, सोन्या मारुती चौक व समस्त लक्ष्मी रोड व्यापारी वर्गाने व्यक्त केली आहे. तीन महीने लॉकडाऊनमध्ये गेल्यानंतर आता व्यावसाय सुरु होऊ लागले असताना संबंधीत प्रकारामुळे व्यावसायला फटका बसेल. त्यामुळे त्यांच्यावर योग्य कारवाई करावी, असेही त्यांनी पोलिस आयुक्ताकडे दिलेल्या निवेदनात नमुद केले आहे.

"आम्ही मागील 100 वर्षापासुन राहत आहोत. देहविक्रय करणाऱ्या महिलांसाठी आम्ही अनेक उपक्रम राबवितो. मात्र लॉकडाऊनपासून संबंधीत इमारतीमध्ये देहविक्रय सुरु झाला आहे. परिणामी आमच्या कुटुंबातील मुलींना, महिलांना वाईट अनुभव येऊ लागले आहेत. त्यावर पोलिसांनी तत्काळ कारवाई करावी", स्थानिक रहीवासी.

आणखी वाचा - शरद पवार पुन्हा ठरले चाणक्य

" स्थानिक नागरिक व लक्ष्मी रोड व्यापारी वर्गाने आमच्याकडे तक्रार दिली आहे. त्याची चौकशी करुन योग्य ती कारवाई केली जाईल.-जगन्नाथ कळसकर, वरिष्ठ पोलिस निरीक्षक, फरासखाना पोलिस ठाणे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Citizens were outraged by the newly started prostitution in the building on Lakshmi Road