शहरे तुपाशी आणि खेडी उपाशी : दळवी

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 22 जुलै 2018

पुणे : "एकीकडे संधी आणि झगमगाटामुळे शहरे ओसंडून वाहत आहेत, तर दुसरीकडे खेडी मात्र ओस पडत आहेत. खरी समृद्धता ही खेड्यांमध्ये असून, ते आजही शहरांवर अवलंबून आहेत. हे चित्र बदलायचे असेल, तर खेडी स्वयंपूर्ण व्हायला हवीत,'' असे मत माजी विभागीय आयुक्त चंद्रकांत दळवी यांनी व्यक्त केले. 

डीपर, सर फाउंडेशन व साद माणुसकीची फाउंडेशनच्या वतीने "सत्तर वर्षांच्या स्वातंत्र्यानंतरही खेडी स्वयंपूर्ण का नाहीत?' या विषयावरील परिसंवादाचे आयोजन करण्यात आले होते. या वेळी ते बोलत होते. भगीरथ ग्रामविकास प्रतिष्ठानचे डॉ. प्रसाद देवधर, ज्येष्ठ पत्रकार डॉ. सागर देशपांडे, ज्येष्ठ पत्रकार यमाजी मालकर आदी उपस्थित होते. परिसंवादाच्या दुपारच्या सत्रात नीट, सीईटी आणि पाचवी व आठवीच्या शिष्यवृत्तीमधील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. 

नीट आणि सीईटीमध्ये यश मिळविणाऱ्या विद्यार्थ्यांना प्रत्येकी 25 हजार, तर शिष्यवृत्तीमधील गुणवंतांना प्रत्येकी 10 हजार रुपयांचा धनादेश देण्यात आला. विद्यार्थ्यांना माफक दरात वसतिगृहाची सोय करून देणाऱ्या डॉ. विठ्ठल गुल्हाणे यांना मानपत्र आणि पंचाहत्तर हजारांचा धनादेश देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला. ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते डॉ. कुमार सप्तर्षी, ऊर्मिला सप्तर्षी, दिलीप अरळीकर, डॉ. राजाभाऊ दांडेकर, सुयोग पेनकर आदी उपस्थित होते. 

Web Title: City and Villages conditions says Dalvi