esakal | अजितदादांचे हे स्वप्न होणार 2022 मध्ये पूर्ण  
sakal

बोलून बातमी शोधा

ajit-pawar

हा प्रकल्प वेळेत पूर्णत्वास जावा, यातील काही तांत्रिक अडचणी दूर होऊन कामास प्रारंभ व्हावा, या साठी कालच अजित पवार यांनी संबंधित अधिकाऱ्यांना सूचना दिल्या आहेत.

अजितदादांचे हे स्वप्न होणार 2022 मध्ये पूर्ण  

sakal_logo
By
मिलिंद संगई

बारामती (पुणे) : बारामती शहर सन 2022 पर्यंत झोपडपट्टीमुक्त करण्यासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पाठपुरावा सुरु केला असून, आता वेगाने या प्रकल्पाच्या हालचाली सुरु झाल्या आहेत. 

खडकवासला धरणातून पुन्हा विसर्ग वाढवला

प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत अल्प उत्पन्न गटातील लोकांना स्वमालकीची पक्के घरे उभारण्यासाठी अनुदान दिले जाणार आहे. यात केंद्र सरकार दीड लाख, तर राज्य सरकार एक लाख, असे अडीच लाख रुपये प्रत्येक झोपडपट्टीधारकास अनुदान दिले जाणार आहे. बारामतीत 330 चौरस फुटांचे पक्के घर झोपडपट्टीधारकास मिळणार आहे. महाराष्ट्र गृह निर्माण विकास महामंडळाच्या मदतीने या प्रकल्पाचे काम होणार आहे. या मध्ये पहिल्या टप्प्यात ज्यांच्या मालकीची किंवा ज्यांच्याकडे जागा उपलब्ध आहे, अशा लोकांना घरदुरुस्ती व घरबांधणीसाठी अनुदान देण्यास प्रारंभ झाला आहे. 

छोट्या आकाराचा सुखकर्ता ठरले मोठ्या आकाराचा विघ्नहर्ता

बारामती नगरपालिकेने अशा प्रवर्गातील 573 लाभधारकांची यादी काढली आहे. यात पहिल्या टप्प्यात 323, तर दुसऱ्या टप्प्यात 250 झोपडपट्टीधारकांची यादी तयार करण्यात आली आहे. यातील 573 पैकी 235 लोकांनी प्रत्यक्ष घर बांधणीस प्रारंभ केला आहे. यात पहिल्या टप्प्यातील 3 कोटी 23 लाखांचे, तर दुसऱ्या टप्प्यातील एक कोटी रुपयांचा हप्ता प्राप्त झाला असून, त्याचे वाटप नगरपालिकेने केले आहे. 

बारामती शहरातील वडकेनगर, डॉ. बाबासाहेब आंबेडकर वसाहत, तांदुळवाडी, प्रतिभानगर, सुहासनगर, साठेनगर, उघडा मारुती मंदीर तसेच डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्टेडीयम लगत (बसस्थानकासमोर) या भागातील झोपडपट्टीधारकांना पक्की घरे उभारुन देण्याचे नियोजन नगरपालिकेकडून झाले आहे. या संदर्भात बारामतीचे मुख्याधिकारी मुंबईला पुढील नियोजनासाठी जाणार असल्याचीही माहिती मिळाली आहे. 

पुणे जिल्ह्यातील नागरिकांनो सावध रहा, हवामान खात्याने दिलाय अलर्ट

बारामतीतील प्रत्येक झोपडपट्टीधारकास त्याच्या मालकीचे किमान 330 चौरस फूटांचे घर मिळावे, हा प्रकल्प वेळेत पूर्णत्वास जावा, यातील काही तांत्रिक अडचणी दूर होऊन कामास प्रारंभ व्हावा, या साठी कालच अजित पवार यांनी संबंधित अधिकाऱ्यांना सूचना दिल्या आहेत. 2022 पर्यंत बारामती शहर झोपडपट्टीमुक्त होण्याच्या दिशेने प्रशासनाने पावले उचलावीत, असे निर्देश त्यांनी दिले आहेत. 

बारामती शहर सन 2022 पर्यंत झोपडपट्टीमुक्त करण्याचे उपमुख्यमंत्र्यांचे निर्देश आहेत. त्यानुसार वेगाने त्या प्रकल्पावर काम सुरु आहे. मुंबई स्तरावरील अडचणीही दूर होत असून, काही तांत्रिक बाबींची पूर्तता करून हा प्रकल्प वेळेत पूर्ण करण्याचा प्रयत्न आहे.
 - किरणराज यादव, मुख्याधिकारी, बारामती नगरपालिका