शहराचा दूध आणि भाजीपाला पुरवठा रोखणार 

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 2 जून 2018

पुणे - दुधाला प्रतिलिटर 27 रुपये खरेदी दर आणि शेतमालाला उत्पादन खर्चाच्या दीडपट हमीभाव मिळावा या मागणीसाठी शेतकरी संघटनेच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर शुक्रवारी धरणे आंदोलन करण्यात आले. दरम्यान, शहराला शनिवारी होणारा दूध आणि भाजीपाला पुरवठा रोखण्याचा इशारा संघटनेने दिला आहे. 

शरद जोशी शेतकरी संघटनेच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन करण्यात आले. शेतकऱ्यांना खरिपासाठी पीककर्ज वेळेत उपलब्ध करून द्यावे, शेतकऱ्यांचे कर्ज आणि वीजबिल माफ करावे, शेतकरी आणि कष्टकऱ्यांना दरमहा पाच हजार रुपये पेन्शन सुरू करावी, यासह विविध मागण्यांचे निवेदन जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांना देण्यात आले. तसेच, या मागण्यांबाबत विचार न केल्यास संघटनेच्या वतीने शहरात होणारा दूध आणि भाजीपाला पुरवठा रोखणार असल्याचा इशारा संघटनेचे प्रदेशाध्यक्ष विठ्ठल पवार, अमृतराव सावंत, नाथा शिंगाडे, नंदा जाधव, पंकज खटाने, विजय माझिरे, अभय पवार आदींनी दिला आहे. 

Web Title: City milk and vegetable supply will be stopped