महत्वाची बातमी : पोलिसांनी पुणे शहरासाठी काय काढलाय आदेश पाहा... 

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 22 मे 2020

शहरातील निर्बंध काहीसे शिथिल झाले आहेत. मात्र  दररोज सायंकाळी सात ते सकाळी सात या वेळेत शहरात संचार मनाई आदेश असणार आहे. तसेच 31 मे पर्यंत संचार मनाई आदेश कायम असणार आहे, अशी माहिती पोलिस सहआयुक्त डॉ. रवींद्र शिसवे यांनी दिली.

पुणे : शहरातील निर्बंध काहीसे शिथिल झाले आहेत. मात्र  दररोज सायंकाळी सात ते सकाळी सात या वेळेत शहरात संचार मनाई आदेश असणार आहे. तसेच 31 मे पर्यंत संचार मनाई आदेश कायम असणार आहे, अशी माहिती पोलिस सहआयुक्त डॉ. रवींद्र शिसवे यांनी दिली.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

कोरोनाचा प्रादुर्भाव जास्त असलेल्या शहरांमध्ये संचार मनाई आदेश कालावधी 31 मे पर्यंत  वाढविण्यात आला आहे.  राज्य सरकारने सर्व नियमांचे पालन करुन दुकाने व अन्य व्यवसा सुरू ठेवण्याच्या सूचना दिल्या आहेत.

हेही वाचा- कोरोनाचे हॉटस्पॉट ठरलंय आनंदनगर

लॉकडाऊनच्या चौथ्या टप्यात शहरात दररोज सायंकाळी सात ते सकाळी सात या कालावधीत संचार मनाई आदेश लागू राहणार आहे. पुणे महानगरपालिकेचे क्षेत्र, पुणे व खडकी छावणी क्षेत्रात आदेश लागू राहणार आहेत, असे डॉ. शिसवे यांनी आदेशात नमूद केले आहे.

पिंपरी चिंचवडच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: The city ordered a curfew between seven in the evening and seven in the morning