‘सिव्हिल आणि पॉलिमर’ अभियांत्रिकीवर वेबिनार

सकाळ वृत्तसेवा
Sunday, 25 October 2020

सिव्हिल आणि पॉलिमर अभियांत्रिकी क्षेत्रातील संधी, बदलत जाणारे स्वरूप व अभ्यासक्रमातील महत्त्वाचे घटक यावर विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यासाठी एमआयटी-डब्ल्यूपीयूच्या अभियांत्रिकी व तंत्रज्ञान विद्याशाखा आणि ‘सकाळ’ माध्यम समूहातर्फे ‘सिव्हिल आणि पॉलिमर’ अभियांत्रिकीवर वेबिनार आयोजित करण्यात आला आहे. हा वेबिनार २६ ऑक्‍टोबर रोजी दुपारी चार वाजता होणार आहे.

पुणे - सिव्हिल आणि पॉलिमर अभियांत्रिकी क्षेत्रातील संधी, बदलत जाणारे स्वरूप व अभ्यासक्रमातील महत्त्वाचे घटक यावर विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यासाठी एमआयटी-डब्ल्यूपीयूच्या अभियांत्रिकी व तंत्रज्ञान विद्याशाखा आणि ‘सकाळ’ माध्यम समूहातर्फे ‘सिव्हिल आणि पॉलिमर’ अभियांत्रिकीवर वेबिनार आयोजित करण्यात आला आहे. हा वेबिनार २६ ऑक्‍टोबर रोजी दुपारी चार वाजता होणार आहे.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

एमआयटी पुणे ही गेल्या चार दशकांचा वारसा पुढे घेऊन जात आहे. तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात उत्कृष्ट काम करणारे उद्योग सज्ज अभियंते तयार करत आहे. उद्योगाच्या वाढत्या गरजा लक्षात घेऊन सिव्हिल अभियांत्रिकी आणि पॉलिमर अभियांत्रिकी या सारखे महत्त्वाचे अभ्यासक्रम एमआयटी-डब्ल्यूपीयूमध्ये शिकवले जातात. बदलत्या काळाच्या गरजा लक्षात घेऊन, आर्टिफिशिअल इंटेलिजन्स, मशिन लर्निंग, डेटा सायन्स, इंटरनेट ऑफ थिंग्ज या विशेष अभ्यासक्रमाचा देखील यामध्ये समावेश आहे.

लग्नाचे फोटो न देणे फोटोग्राफरच्या अंगाशी; दंड म्हणून द्यावे लागणार दोन लाख रुपये!

पॉलिमरची बाजारपेठ १ ट्रिलियन डॉलर्सपेक्षा जास्त आहे आणि ही संख्या वाढत आहे. नवीन संशोधनामुळे, पॉलिमर अभियांत्रिकी, इलेक्‍ट्रॉनिक्‍स, बायोडिग्रेडेबल प्लास्टिक, वैद्यकीय उपकरणे या सर्व क्षेत्रात उपयुक्त ठरत आहे. सध्याच्या काळात, विविध पायाभूत प्रकल्पांच्या उभारणीसाठी सिव्हिल इंजिनिअर्सची गरजही वाढत आहे. धरणाच्या कामापासून ते रस्ते आणि इमारती बांधण्यापर्यंत सर्वच कामांसाठी सिव्हिल अभियंत्यांची आवश्‍यकता वाढत आहे. या दोन्ही अभ्यासक्रमांची वाढती गरज लक्षात घेऊन. हा एमआयटी-डब्ल्यूपीयू, पुणे आणि ‘सकाळ’ माध्यम समूहातर्फे हा वेबिनार आयोजित केला. इच्छुक विद्यार्थी यासाठी नोंदणी करावी. 

Edited By - Prashant Patil


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Civil and polymer engineering webinar