दाव्याची पहिली पायरी होतेय स्मार्ट; वाचा सविस्तर

claim become easy with E-filing.jpg
claim become easy with E-filing.jpg

पुणे : न्यायालयीन कामकाजात सुरू असलेली पारंपरिक पद्धती हे उशिरा न्याय मिळण्याचे प्रमुख कारण ठरत असल्याचा निष्कर्ष अनेकदा काढण्यात आला आहे. मात्र कोरोनाची परिस्थिती आणि गेल्या काही महिन्यांमध्ये  बदललेले तंत्रज्ञान याचा विचार करत न्यायालयीन कामकाजात अमुलाग्र बदल होण्याची चिन्हे आहेत. त्याची सुरुवात देखील झाली असून वाद मिटवण्याची पहिली पायरी असलेले दावा दाखल करण्याचे कामकाज आता स्मार्ट झाले आहे. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप
पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे  क्लिक करा

सर्वच प्रकारच्या न्यायालयांत ही सुविधा सुरू करण्यास प्राधान्य देण्यात येत आहे. न्यायालयात जाणाऱ्या तक्रारीचा प्रवास हा दावा दाखल करण्यापासून सुरू होत असतो. त्यानंतर न्यायालयीन टप्पे पार करत ते प्रकरण निकाली लागते. या काळात विविध कारणांनी उशीर झाल्याने दाव्यास अनेक वर्ष लागतात. त्यामुळेच आता दावा दाखल करून घेण्यापासुनच अद्ययावत बाबींचा वापर करण्यात येत असून न्यायालयाच्या कामकाजात होत असलेल्या आधुनिकीकरणाची नांदी म्हणून या बदलाकडे पाहिले जात आहे. जिल्हा न्यायालय, ग्राहक मंच, कामगार, औद्योगिक व सहकार न्यायालय, विविध प्रकारची प्राधिकरणे यांच्यात दरवर्षी हजारो दावे दाखल होत असतात. दावे दाखल करताना मोठ्या प्रमाणात कागदपत्रे न्यायालयात जातात. तेव्हापासून प्रकरण निकाली लागेपर्यंत ती कागदपत्रे न्यायालय प्रशासनाला सांभाळावी लागतात. ई-फाइलिंगमध्ये मोजक्या व डिजिटल कागदपत्रांमध्ये दावा दाखल होत असतो. 

पुण्यात गुंडाराज ; वर्चस्ववादातून लाॅकडाउनमधील तिसरा खून

ई-फायलिंग म्हणजे काय :
प्रकरण नेमके काय आहे आणि त्यासंबंधीचे कागदपत्रे दाव्याच्या वेळी दाखल विभागात दिली जातात. हे सर्व कागदपत्रे दाखल करून घेत केस नंबर दिला जातो. आता ही सर्व प्रक्रिया ऑनलाईन होत आहे. https://efiling.ecourts.gov.in या संकेतस्थळावरून दावा दाखल केला जाऊ शकतो. सध्या सर्व न्यायालयात ही सुविधा उपलब्ध नसली तरी ती पुरवण्याबाबत उपाययोजना सुरु आहे. त्याबाबतची मागणी वकिलांकडून होत आहे.

पुणेकरांनो,पुढचे २ दिवस घरातच राहा कारण..

दावा दाखल करताना येणाऱ्या अडचणी : 
ई-फायलिंग करताना कागदपत्रे डिजिटल करणे गरजेचे असते. कागदपत्रे स्कॅन करुन अपलोड करावी लागतात. भरपूर कागदपत्रे असतील तर ही प्रक्रिया काहीशी वेळखाऊ होऊ शकते. पानांचा आकार व इतर तांत्रिक बाबी काटेकोरपणे पाळाव्या लागतात. त्यासाठी वकीलाला सर्व तांत्रिक बाबी माहिती असायला हव्या. तांत्रिक बॅकअप देखील पुरवला गेला पाहिजे.

आम्हाला धान्य कधी मिळणार? लॉकडाऊन संपल्यावर... : संतप्त नागरिकांचा सवाल

ई- फायलिंगची यंत्रणा चांगली असून त्यातील तांत्रिक बाबींचे वकिलांना प्रशिक्षण देणे गरजेचे आहे. त्यामुळे काही दिवस दोन्ही पद्धती चालू ठेवाव्या लागतील. आधुनिकतेमुळे तालुका पातळीवर वकील देखील उच्च व सर्वोच्च न्यायालयात प्रॅक्टिस करू शकतील. या सर्वाला प्रशासनाने तांत्रिक सपोर्ट त्यापद्धनी उपलब्ध करून द्यावा.
- एस. के. जैन,  ज्येष्ठ वकील 

खवय्ये पुणेकरांनो, ऐकलंत का? आपलं `वैशाली` हाॅटेल सुरू झालयं

सर्वत्र ई-फायलिंग झाले पाहिजे. त्यातुन गर्दी कमी होऊन सामाजिक आरोग्य धोक्यात येणार नाही. ई-फायलिंगमध्ये कागदपत्रे सादर करताना अडचणी येतात. फाईल स्कॅन केल्यानंतर तिची प्रत चांगली राहत नाहीत. परदेशात याबाबत चांगली सुविधा आहेत. त्या तांत्रिक बाबी आपण समजून घेतल्या पाहिजे. कोरोनाने आता वेळ आणली की आपल्याला न्यायालयीन आधुनिकीकरण करावे लागणार आहे.
- अॅड. असीम सरोदे

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com