Pune 11th Admission: शिक्षण विभागाचा ‘रात्रीस खेळ चाले’! अकरावीच्या दुसऱ्या फेरीची प्रवेशनिश्‍चिती रात्री नऊपर्यंत, पालकांमध्ये संभ्रम

FYJC second admission round deadline extended till 9 PM: अकरावी प्रवेशाच्या दुसऱ्या फेरीत अंतिम क्षणी मुदतवाढ; रात्री नऊपर्यंतची घोषणा संकेतस्थळावर उशिरा, विद्यार्थी-पालक व महाविद्यालये हैराण
Unexpected Deadline Extension in Class 11 Admissions Raises Questions Over Planning

Unexpected Deadline Extension in Class 11 Admissions Raises Questions Over Planning

sakal

Updated on

पुणे : इयत्ता अकरावीच्या प्रवेश प्रक्रियेतील दुसऱ्या नियमित फेरीतील प्रवेश निश्चित करण्यासाठी मंगळवारपर्यंत (ता. १६) मुदत दिली होती. दरम्यान, भरपाई कालावधी म्हणून विद्यार्थी प्रवेश निश्चित करण्यासाठी माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण विभागाने मंगळवारी रात्री नऊ वाजेपर्यंत प्रवेश निश्चित करता येतील, अशी माहिती मंगळवारी दुपारी साडेतीनच्या सुमारास संकेतस्थळाद्वारे दिली. त्यामुळे विद्यार्थी-पालकांमध्ये गोंधळाचे वातावरण निर्माण झाले. परिणामी शिक्षण विभागाचा अजब कारभार आणि ढिसाळ नियोजन पुन्हा एकदा चव्हाट्यावर आले आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com