पूर्व हवेलीतील इयत्ता पाचवी ते आठवीचे वर्ग सुरू

जनार्दन दांडगे
Wednesday, 27 January 2021

पूर्व हवेलीतील लोणी काळभोर, थेऊर, कुंजीरवाडी, सोरतापवाडी व उरुळी कांचन येथील इयत्ता पाचवी ते आठवीच्या शाळा सुरू करण्यात आल्या आहेत. 

उरुळी कांचन : कोरोना रोगाचा प्रादुर्भाव कमी झाल्याने जिल्ह्यातील इयत्ता पाचवी ते आठवीच्या शाळा बुधवारी (ता. २७) सुरू झाल्या आहेत. कोरोना नियमांचे पालन करत पूर्व हवेलीतील लोणी काळभोर, थेऊर, कुंजीरवाडी, सोरतापवाडी व उरुळी कांचन येथील इयत्ता पाचवी ते आठवीच्या शाळा सुरू करण्यात आल्या आहेत. 

पुण्यातील इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा

कोरोना संदर्भातील सर्व उपयोजना अमलात आणून सर्व नियम पाळून शाळा सुरू करण्यात आल्या आहेत. तब्बल दहा महिन्याच्या कालावधीनंतर व मोठ्या सुट्टीनंतर विद्यार्थी शाळेमध्ये दाखल झाले आहेत. ऊरुळी कांचन येथील महात्मा गांधी विद्यालयात 351 विद्यार्थी उपस्थित असल्याची माहिती विद्यालयाचे मुख्यध्यापक बबन दिवेकर यांनी दिली. तसेच लोणी काळभोर येथील पृथ्वीराज कपूर मेमोरियल हायस्कूल येथे 149 विद्यार्थ्यांनी हजेरी लावली असल्याची माहिती मुख्याध्यापक सीताराम गवळी यांनी दिली. 

शालेय शिक्षण विभागाकडून ज्याप्रमाणे सूचना व माहिती दिली त्या  महितीनुसार शाळेमध्ये अंमलबजावणी करण्यात येत आहे. शाळा सुरू होण्यापूर्वी वर्ग पूर्ण सॅनेटाईज करण्यात आले होते. त्याचप्रमाणे पालकांकडून संमती पत्र घेण्यात आले होते. त्याचबरोबर पालक मीटिंग घेऊन ज्या पालकांनी संमती पत्र दाखल केले आहे अशाच पालकांची मुले शाळेत दाखल झाले आहेत. शाळा सुरू करण्याच्या पार्श्वभूमीवर अनेक उपयोजना करण्यात आले आहेत. यामध्ये मीटर तपासणी, जागोजागी सॅनी टायझर, प्रत्येक विध्यार्थीना मास्क यासारख्या उपाययोजना शाळेत करण्यात आलेले आहे. 

हे वाचा - 'तुम्हाला जिवंत सोडत नाही'; जमीन वाटपाच्या रागातून इंदापुरात महिलेचा खून!

शालेय विभागाकडून ज्याप्रमाणे सूचना येतील त्याप्रमाणे सूचनांची अंमलबजावणी करण्यात येत आहे. विद्यार्थ्यांना योग्य त्या सूचना देऊन त्याचे पालन करण्यास सांगितले.-बबन दिवेकर, प्राचार्य महात्मा गांधी विद्यालय, उरुळी कांचन

दहा महिन्याच्या सुट्टीनंतर आज शाळा सुरू झाल्याने वर्ग मैत्रिणी भेटल्याने आनंद झाला आहे. ऑनलाइन शिक्षणापेक्षा ऑफलाइन शिक्षणच चांगले आहे. त्यामुळे शिक्षक विद्यार्थ्यात संवाद सुरू झाला आहे. -तनिष्का दत्तात्रय खेडेकर, विद्यार्थीनी, इयत्ता सातवी, उरुळी कांचन 

(संपादन : सागर डी. शेलार)

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: classes V to VIII started in east haveli area