महापालिका शाळांत शुद्ध थंड पाणी

water-filter
water-filter

पिंपरी - पालिका शाळांमध्ये महिला व बाल कल्याण विकास विभागाच्या योजनेतून पाणी शुद्धीकरण यंत्र (वॉटर फिल्टर व कुलर) बसविण्यात येणार आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना शुद्ध व थंड पाणी मिळणार आहे.

प्राथमिक व माध्यमिक शाळांमध्ये पहिली ते दहावीपर्यंत सुमारे ५० हजार विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. मात्र, अनेक शाळांमध्ये विद्यार्थ्यांना भौतिक सुविधांपासून वंचित राहावे लागत होते. अनेकांना पिण्याच्या पाण्यासाठी हाल सोसावे लागत असल्याचे सभापती निर्मला कुटे यांच्या निदर्शनास आल्यावर त्यांनी शाळावार पाणी शुद्धीकरण यंत्र बसविण्याचा निर्णय घेतला. मात्र, विधानसभा निवडणुकीच्या आचारसंहितेमुळे खरेदीला ‘ब्रेक’ लागला. पण आता आचारसंहिता संपल्यामुळे शिक्षण विभागाकडून शाळांची यादी प्राप्त झाली असून महिनाअखेरीस या कामाला सुरुवात करणार असल्याने नवीन वर्षापासून शाळेतील विद्यार्थ्यांना पिण्याचे शुद्ध व थंड पाणी मिळणार आहे. ज्या शाळांची पटसंख्या अधिक आहे, अशा शाळांमधील मजल्यावर दोन किंवा तीन बसविण्याचे नियोजन आहे. महापालिकेच्या इतिहासात प्रथमच विद्यार्थ्यांच्या आरोग्यासाठी शुद्धीकरण यंत्र बसविण्यात येत आहे.

१०५ प्राथमिक शाळा
१२४ यंत्रसंख्या
१८ माध्यमिक शाळा
२१ यंत्रसंख्या

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com