स्वच्छ इंधनाचा पर्याय; इथर आणि एलपीजी मिश्रीत गॅस स्टोव्हचा शुभारंभ 

ncl
ncl

पुणे- स्वच्छ उर्जास्रोत असलेल्या डायमिथिल इथर (डीएमई) आणि एलपीजी मिश्रित इंधन गॅससाठीच्या स्टोव्हचे उद्‌घाटन केंद्रीय विज्ञान आणि तंत्रज्ञानमंत्री डॉ. हर्षवर्धन यांच्या उपस्थितीत व्हर्च्युअल पद्धतीने झाले. राष्ट्रीय रासायनिक प्रयोगशाळेच्या (एनसीएल) शास्त्रज्ञांनी डायमिथिल इथर तयार करण्यासाठी एक प्रक्रिया विकसित केली असून, आता त्यांनी प्रत्यक्ष स्टोव्ह बाजारात आणला आहे. एनसीएलच्या उत्प्रेरक आणि अकार्बनीय रसायन विभागाचे शास्त्रज्ञ डॉ. टी. राजा यांच्या नेतृत्वातील गटाने हे संशोधन केले आहे. या संशोधनामुळे घरगुती वापरासाठी स्वच्छ इंधनाचा एक पर्याय उपलब्ध झाला असून, एनसीएलमध्ये प्रायोगिक उत्पादनही करण्यात येत आहे. वैज्ञानिक आणि औद्योगिक संशोधन संस्थेच्या (सीएसआयआर) "आदिती ऊर्जा संस्थान' या मोहिमेअंतर्गत औद्योगिक स्टोव्ह, वाहने आदींवर संशोधन आणि विकासकामे करण्याची योजना आहे.

नेहा कक्करच्या 'हल्दी सेरेमनीचे' फोटो पाहिलेत ?

डीएमईची वैशिष्ट्ये
- डायमिथिल इथर हे स्वच्छ इंधन असून, यातून कार्बनचे उत्सर्जन कमी होते
- त्यांची ज्वलनक्षमता खूप जास्त आहे.
- एलपीजीसोबत त्याचे मिश्रण शक्‍य

स्टोव्हची वैशिष्ट्ये
- स्वतंत्र डीएमई किंवा एलपीजीमिश्रित डीएमईसाठी वापरता येतो
- पारंपरिक बर्नरच्या तुलनेत ज्योतीची उंची आणि ज्वलनक्षमता जास्त
- कार्बनमुळे काजळी तयार होत नाही
- पारंपरिक स्टोव्हच्या तुलनेत 10-15 टक्के कार्यक्षमता जास्त

स्टोव्हचे फायदे
- कार्बनचे उत्सर्जन कमी असल्यामुळे प्रदूषणात घट होईल
- एलपीजीमध्ये डीएमई इंधनाचे मिश्रण केल्यास 20 टक्के एलपीजीची बचत होईल
- पर्यायाने इंधनाची आयात कमी होऊन कोट्यवधी रुपयांची परकीय गंगाजळी वाचेल

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com