स्वच्छतेसाठी एकवटले अख्खे गाव

रामदास वाडेकर
बुधवार, 29 ऑगस्ट 2018

तत्पूर्वी स्वच्छता मोहीमेचे महत्व विशद करताना तुकाराम जाधव म्हणाले,'स्मार्ट व्हिलेज कडे गावाची वाटचाल सुरू आहे,विविध उपक्रमांने गावाची वेगळीओळख निर्माण झाली आहे,या पुढे गावातील स्वच्छता राखण्यासाठी सतत असे उपक्रम रासविणे गरजेचे आहे.

टाकवे बुद्रुक : कशाळ गावचे सरपंच, उपसरपंच, सदस्य, शिक्षक, अंगणवाडी सेविका, ग्रामस्थ, तरूण आणि महिलांनी आख्खा गाव झाडून स्वच्छ केला. गावातील केरकचरा,सांडपाणी,रस्त्यावरील शेवाळ दूर सारून गावात स्वच्छतेचे धडे गिरवले. रावाने केलेले आवाहन आख्छा गावाने स्वीकारले आणि स्वच्छतेसठी गाव एकवटला, तंटामुक्त गाव समिती, सार्वजनिक तरूण मंडळे यात सहभागी झाले आणि पाहता पाहता काही घटकेत गावाचे रूपच पालटले.

निमित्त होते येथे स्वच्छ सर्वेक्षण अंतर्गत ग्रामपंचायतीच्या वतीने गाव स्वच्छता मोहीम राबविण्याची, गावातील मंदिरे व परिसर ,स्मशानभुमी ,अंगणवाडी केंद्र , प्राथमिक 
शाळा व पटांगण, रस्ते,चौक याठिकाणी पडलेला कचरा काढून साचलेल्या पाण्याला मोकळी वाट करून दिली,तूंबलेली डबकी बुडवली ,शाळेच्या प्रांगणातील गवत काढले.सर्वत्र पडलेला कचरा,कागदाचे तुकडे,प्लास्टिकच्या बाटल्या उचलून स्वच्छता केली. सरपंच यमुना गवारी,उपसरपंच योगेश मदगे, तुकाराम जाधव , सुरेखा जाधव,आशा जाधव,यशोदा निखोटे,शांता विरणक यांच्या गावातील सर्वाचा या स्वच्छता मोहीमेत सहभाग राहिला.

तत्पूर्वी स्वच्छता मोहीमेचे महत्व विशद करताना तुकाराम जाधव म्हणाले,'स्मार्ट व्हिलेज कडे गावाची वाटचाल सुरू आहे,विविध उपक्रमांने गावाची वेगळीओळख निर्माण झाली आहे,या पुढे गावातील स्वच्छता राखण्यासाठी सतत असे उपक्रम रासविणे गरजेचे आहे. त्यामुळे स्वच्छ व प्रसन्न राहील ,शिवाय गावात आरोग्य नांदेल. शरद जाधव यांनी प्रास्ताविक केले .नवनाथ जाधव यांनी सुञसंचालन केले. नारायण जाधव यांनी आभार मानले.

Web Title: cleaning in Village