
पुणे जिल्ह्यातील पाच तालुक्यांमधील जवळपास ५० गावांतून आणि चार राष्ट्रीय महामार्गांना जोडणाऱ्या सुमारे १०५ किलोमीटर लांबीच्या महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाच्या (एमएसआरडीसी) पूर्व भागातील रिंगरोडला राज्य सरकारने अंतिम मान्यता दिली आहे.
पुणे - जिल्ह्यातील पाच तालुक्यांमधील जवळपास ५० गावांतून आणि चार राष्ट्रीय महामार्गांना जोडणाऱ्या सुमारे १०५ किलोमीटर लांबीच्या महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाच्या (एमएसआरडीसी) पूर्व भागातील रिंगरोडला राज्य सरकारने अंतिम मान्यता दिली आहे. त्यामुळे पश्चिम भागाबरोबरच पूर्व भागातील रिंगरोडसाठी भूसंपादनाचा मार्ग मोकळा झाला आहे.
पूर्व रिंगरोड भागातील मार्गिका अंतिम झाल्यामुळे त्यांचा समावेश पुणे महानगर क्षेत्र विकास प्राधिकरणाच्या (पीएमआरडीए) विकास आराखड्यात करणार आहे. रिंगरोडच्या पश्चिम भागातील मार्गाचे सर्वेक्षण यापूर्वीच पूर्ण झाले आहे. तसेच त्यास राज्य सरकारने मान्यता दिली असून त्याला राज्य महामार्गाचा दर्जा मिळाला आहे.
- ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप
- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा
त्याच्या भूसंपादनाची प्रक्रिया सुरू करण्यासाठी पहिल्या टप्प्यात संपादित करण्यात येणाऱ्या जमिनींची मोजणी करण्याची कार्यवाही एमएसआरडीसीने सुरू केली आहे.
याबाबत वडगाव मावळ येथील श्री पोटोबा देवस्थानचे मुख्य विश्वस्त सोपानराव म्हाळसकर म्हणाले, ‘सरकारने मान्यता दिलेल्या पूर्व भागातील रिंगरोडच्या मार्गीकेबाबत येथील नागरिक अद्याप अनभिज्ञ आहेत. हा रिंगरोड उर्से व परंदवडी येथून वडगावला कसा येणार आहे? याबाबत कोणालाच माहिती नाही. नवीन मार्गीकेचा नकाशा पाहिल्यानंतरच त्याच्या फायद्या-तोट्याबाबत चर्चा करता येईल.’
पुण्यात 24 तासात आगीची दुसरी घटना; बिबवेवाडीत मंडप सजावटीच्या गोदाम भस्मसात
मावळ : परंदवाडी, उर्से, तळेगाव, वडगाव, कातवी, आंबी, वराळे, आकुर्डी, नाणोलीतर्फे चाकण, इंदुरी, सुदवडी, सुदुंबरे.
हवेली : तुळापूर, भावडी, लोणीकंद, पेरणे, बकोरी,
डोंगरगाव, वाडे बोल्हाई, गावडेवाडी, मुरकुटेनगर, बिवरी, पेठ, कोरेगाव मुळ, शिंदवणे, वळती, तरडे, आळंदी म्हातोबाची.
पुरंदर : सोनोरी, काळेवाडी, दिवे, हिवरे, चांबळी, कोडीत खुर्द, गराडे.
खेड : खालुंब्रे, निघोजे, मोई, कुरळी, चिंबळी, केळगाव,आळंदी, चऱ्होली खुर्द, धानोरे, सोळू, मरकळ, गोळेगाव.
भोर : कांबरे, नायगाव, केळवडे.
कसा असणार मार्ग - ६ पदरी - एकूण ७ बोगदे, ७ अंडरपास, दोन नदीवरील आणि दोन रेल्वे मार्गावरील ओलांडणी पूल
१०५ कि.मी. - एकूण लांबी
११० मीटर - एकूण रुंदी
८६० हेक्टर - जागा संपादन
१४३४ कोटी - अंदाजे खर्च
सुमारे ४ हजार ७१३ कोटी - महामार्ग बांधणीचा खर्च
पिंगळे वस्ती आग लागल्याने महावितरणच्या केबल जळून खाक
असा असेल दुसरा टप्पा
Edited By - Prashant Patil