पिंगळे वस्ती आग लागल्याने महावितरणच्या केबल जळून खाक 

सकाळ वृत्तसेवा
Wednesday, 3 March 2021

दुपारी अचानक आग लागल्याने ढवळे वस्ती आणि बिडकर वस्ती येथे भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. तरीही परिसरातील अनेकांनी आग पाहण्यासाठी गर्दी केली होती.

घोरपडी :  पिंगळे वस्ती येथे महावितरणच्या रोहित्र जवळ आग लागल्याने महावितरणचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. दुपारी चारच्या सुमारास ही आग लागल्याने परिसरात घबराट पसरली होती. आगीचे कारण समजू शकले नाही परंतु परिसरात पसरलेल्या कचऱ्याने आग भडकली होती. यामध्ये महावितरणच्या वाडिया सेंटर आणि भारत फोर्ज सेंटरच्या काही केबल जाळून खाक झाल्या आहेत. त्यामुळे महावितरण विभागाचे मोठे नुकसान झाले आहे. हडपसर अग्निशमन दलाचे वाहन तातडीने घटनास्थळी दाखल झाले व आग आटोक्यात आणली. त्यामुळे कोणतीही जीवितहानी झाली नाही, तसेच मोठी दुर्घटना टाळण्यात अग्निशमन दलाला यश मिळाले. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा 
 

दुपारी अचानक आग लागल्याने ढवळे वस्ती आणि बिडकर वस्ती येथे भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. तरीही परिसरातील अनेकांनी आग पाहण्यासाठी गर्दी केली होती. आग लागल्याच्या जागेपासून जवळच रेल्वेची उच्च विद्युत वाहिनी जात मोठा धोका निर्माण झाला असता पण लवकर आग आटोक्यात आणल्याने रेल्वेचे कोणतेही नुकसान झाले नाही.

आगीच्या घटनेमुळे परिसरात काही काळ वीजपुरवठा खंडित झाला होता, परंतु काही वेळाने पुन्हा सुरळीत करण्यात आला. संध्याकाळी उशिरा पर्यंत आर्मी क्रीडा संकुल मधील वीजपुरवठा बंद होता.
रास्ता पेठेत इमारतीला भीषण आग; 3 फ्लॅट्स व 2 दुकानं भस्मसात 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: MSEDCL cables burnt due to fire in Ghorpadi Pune City