इंदापुर तालुक्यात जनता कर्फ्यूला शंभर टक्के प्रतिसाद; 20 सप्टेंबरपर्यंत कर्फ्यू सुरू राहणार

सकाळ न्यूज नेटवर्क
Saturday, 12 September 2020

कोरोनाला रोखण्यासाठी पाळलेल्या जनता कर्फ्यूला पहिल्या दिवशी इंदापूर शहर व पंचक्रोशीत शंभर टक्के प्रतिसाद मिळाला.

इंदापूर (पुणे) : कोरोनाला रोखण्यासाठी पाळलेल्या जनता कर्फ्यूला पहिल्या दिवशी इंदापूर शहर व पंचक्रोशीत शंभर टक्के प्रतिसाद मिळाला. "बंद'मधून अत्यावश्‍यक सुविधांना सवलत दिली असून हा कर्फ्यू 20 सप्टेंबरपर्यंत सुरू राहणार आहे. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

इंदापुरात आज सर्व दुकाने बंद होती. नेहमीच्या वर्दळीच्या रस्त्यावर शुकशुकाट होता. तालुक्‍यातील भाटनिमगाव, अवसरी, बाभूळगाव, भांडगाव, कांदलगाव, शहा, माळवाडी 1 व 2, पिंपरी खुर्द, शिरसोडी, बिजवडी, कळाशी, गंगावळण, वरकुटे बुद्रुक, तरंगवाडी, गोखळी, गलांडवाडी नंबर 1 व 2 मध्येही कडकडीत बंद पाळण्यात आल्याने जनजीवन व दळणवळण ठप्प होते.

Breaking : राज्य सरकारने रेडी-रेकनरच्या दरात केली वाढ; सर्वाधिक पुणे जिल्ह्यात तर...

कोरोनावर नियंत्रण मिळवण्यासाठी जनता कर्फ्यूचा उपयोग होणार आहे. नागरिकांनी सरकारच्या सूचनांचे पालन करावे, असे आवाहन राज्यमंत्री दत्तात्रय भरणे, पंचायत समितीच्या सभापती पुष्पा रेडके, नगराध्यक्षा अंकिता शहा यांनी केले आहे. 

 

वडापुरी परिसरात कडकडीत बंद 

वडापुरी : इंदापूर तालुक्‍यात कोरोना संसर्गजन्य आजाराचे रुग्ण दिवसेंदिवस मोठ्या प्रमाणात वाढत असल्याने व प्रशासनाने केलेल्या आवाहनानुसार इंदापूर तालुक्‍याच्या ग्रामीण भागातील नेहमी गजबजलेले चौक जनता कर्फ्युमुळे ओसाड पडले होते. कोरोनाला रोखण्यासाठी नागरिकांनी जनता कर्फ्युला चांगला प्रतिसाद दिल्याचे परिसरात कडकडीत बंद पाळल्याचे चित्र दिसत होते. ग्रामीण भागात जनता कर्फ्यू लागू केल्याने इंदापूर तालुक्‍यातील वडापुरी, काटी, रेडा, रेडणी, अवसरी, शेटफळ हवेली, बेडशींग, बाबुळगाव गावांमध्ये जनता कर्फ्यूला चांगला प्रतिसाद मिळाला असल्याचे पहावयास मिळत आहे. सरकारी दवाखाने, मेडिकल, अत्यावश्‍यक सेवा वगळून सर्व व्यापारी दुकाने बंद असल्याने ठिक ठिकाणी शुकशुकाट पाहायला मिळत असून रस्ते ओसाड दिसू लागली आहेत. 

पश्‍चिम भागात जनता कर्फ्यूमुळे शांतता 
वालचंदनगर : इंदापूर तालुक्यामध्ये आजपासून जनता कर्फ्यू सुरू झाला असून, 20 ऑगस्टपर्यंत जनता कर्फ्यू आहे. मेडिकल व दवाखाने वगळता सर्व दुकाने बंद होती. त्यामुळे रस्त्यावरची गर्दी ही कमी झालेली दिसली. 
इंदापूर तालुक्यामध्ये कोरोनाचा संसर्ग वाढल्याने प्रशासनाने कोरोनाची साखळी तोडण्यासाठी सर्वांच्या सहमतीने जनता 12 ते 20 ऑगस्टदरम्यान जनता कर्फ्यू जाहीर केला आहे. पश्‍चिम भागातील नागरिकांनी शासनाच्या नियमांचे पालन करण्यास सुरवात करण्यात आली. दुपारी तीननंतर पश्‍चिम भागातील बहुतांश पेट्रोल पंपावर डिझेल व पेट्रोलची विक्री बंद ठेवण्यात आली. रस्त्यावरील भाजी विक्री, किराणा दुकाने बंद होती. नागरिकांनी महत्त्वाच्या व अत्यावश्यक सेवेशिवाय घराच्या बाहेर पडू नये. आरोग्य विभागाच्या तपासणीला सहकार्य करावे, असे आवाहन वालचंदनगर पोलिस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक दिलीप पवार यांनी केले आहे.  
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: "Closed" in rural areas including Indapur city