हल्ल्याच्या निषेधार्थ वकिलांचे काम बंद 

हल्ल्याच्या निषेधार्थ वकिलांचे काम बंद 

पुणे - ऍड. देवानंद ढेकणे यांच्यावर सोमवारी रात्री झालेल्या प्राणघातक हल्ल्याचा मंगळवारी शहरातील सर्व वकिलांनी निषेध नोंदविला. 

वकिलांनी दिवसभर काम बंद ठेवण्याबरोबरच वकिलावर हल्ला करणाऱ्या आरोपींचे आरोपपत्र न घेण्याचा निर्णय घेतला. दरम्यान, वकिलांच्या काम बंद आंदोलनामुळे न्यायालयात कामकाज होऊ शकले नाही. 

ऍड. ढेकणे हे सोमवारी रात्री घरी जात असताना दुचाकीवरून आलेल्या दोघांनी त्यांच्यावर पिस्तुलातून तीन गोळ्या झाडल्या. त्यांना तत्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आले. या घटनेची माहिती शिवाजीनगर न्यायालयातील वकिलांना मिळताच अनेकांनी रुग्णालयाकडे धाव घेतली होती. तसेच या प्रकारावरून वकिलांमध्ये संतापाची भावना निर्माण झाली. मंगळवारी सकाळी सर्व वकिलांनी या घटनेच्या निषेधार्थ न्यायालयातील कामावर बहिष्कार टाकण्याचे ठरविले. त्यानुसार पुणे बार असोसिएशनचे अध्यक्ष सुभाष पवार यांच्या नेतृत्वाखाली संघटनेचे पदाधिकारी, सदस्य व सर्व वकिलांनी दुपारी बारा वाजता न्यायालयाच्या प्रवेशद्वाराजवळ येऊन निषेध नोंदविला. त्यानंतर सर्व जण न्यायालयातील कामकाज बंद ठेवण्यासाठी न्यायालयामध्ये गेले. त्यांनी सर्व वकिलांना कामकाज सुरू न ठेवण्याबाबत विनंती केली. 

कौटुंबिक न्यायालयामध्ये दि पुणे फॅमिली कोर्ट लॉयर्स असोसिएशन या संघटनेतर्फेही ऍड. ढेकणे यांच्यावरील हल्ल्याचा निषेध नोंदविण्यासाठी सभा घेण्यात आली. त्यामध्ये संघटनेच्या अध्यक्ष ऍड. वैशाली चांदणे यांच्यासह सर्व पदाधिकारी व सदस्यांनी आवर्जुन उपस्थिती लावून या घटनेचा निषेध नोंदविला.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com