ढगाळ वातावरणामुळे पुणेकरांना दिलासा

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 5 मे 2017

पुणे - शहरात गुरुवारी दुपारनंतर ढगाळ वातावरण निर्माण झाले होते. त्यामुळे दुपारी तीन वाजल्यानंतर उन्हाच्या चटक्‍यातून पुणेकरांना दिलासा मिळाला. पुढील चोवीस तासांमध्ये आकाश अंशतः ढगाळ राहण्याची शक्‍यता असून, कमाल तापमानाचा पारा ४० अंश सेल्सिअसच्या दरम्यान राहील, असाही अंदाज हवामान खात्यातर्फे वर्तविण्यात आला. 

शहर आणि परिसरात किमान तापमानाचा पारा वाढला. गुरुवारी सकाळी साडेआठ वाजेपर्यंत किमान तापमान ३.५ अंश सेल्सिअसने वाढून २४.६ अंशावर पोचले. त्यामुळे पुणेकर गुरुवारी रात्री उकाड्याने हैराण झाले होते. गुरुवारी सकाळपासूनच कडक उन्हाला सुरवात झाली. सकाळी साडेनऊ-दहा वाजता कार्यालयात जाण्यासाठी दुचाकीवरून प्रवास करणारे कर्मचारी चेहऱ्यावर रुमाल बांधून जात असल्याचे चित्र चौका-चौकांत दिसत होते. 

दुपारनंतर स्थानिक वातावरणाच्या परिणामामुळे शहरात ढगाळ वातावरण निर्माण झाले. त्यामुळे चाळिशीच्या जवळपास असलेल्या कडक उन्हाच्या चटक्‍यातून पुणेकरांना दिलासा मिळाला. पुढील चोवीस तास आकाश अंशतः ढगाळ राहणार असून, त्यानंतर शनिवारपासून (ता. ६) आकाश निरभ्र होईल, असा अंदाज हवामान खात्यातर्फे वर्तविण्यात आला आहे. यादरम्यान कमाल तापमानाचा पारा ३९ ते ४० अंश सेल्सिअसदरम्यान राहील, असेही स्पष्ट करण्यात आले आहे.

Web Title: Cloudy atmosphere