esakal | बारामती तालुक्याच्या अनेक भागात ढगफुटीसदृश पाऊस
sakal

बोलून बातमी शोधा

Cloudy rain in many parts of Baramati District

सुमारे तीन तास ढगांचा गडगडाट, विजांचा लखलखाट व सोसाट्याचा वारा असे पावसाचे तांडव तालुक्याच्या अनेक भागात सुरु होते. वाकी, चोपडज, मुर्टी, पळशी, मोढवे, मोराळवाडी, कानाडवाडी, वडगावनिंबाळकर परिसरात ढगफुटीसारखा पाऊस झाला.  वाकी तलावाच्या सांडव्यावरुन बाहेर आलेल्या पाण्याने कमालीचे नुकसान झाले आहे. 

बारामती तालुक्याच्या अनेक भागात ढगफुटीसदृश पाऊस

sakal_logo
By
मिलिंद संगई, बारामती

बारामती : तालुक्याच्या अनेक भागात काल रात्री ढगफुटीसदृश पाऊस झाल्याने अनेक ठिकाणी शेतीचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. वडगाव निंबाळकर परिसरातही घरात पाणी शिरल्याने काही घरांचे नुकसान झाल्याची माहिती राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष संभाजी होळकर यांनी दिली. 

देशभरातील इतर बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

सुमारे तीन तास ढगांचा गडगडाट, विजांचा लखलखाट व सोसाट्याचा वारा असे पावसाचे तांडव तालुक्याच्या अनेक भागात सुरु होते. वाकी, चोपडज, मुर्टी, पळशी, मोढवे, मोराळवाडी, कानाडवाडी, वडगावनिंबाळकर परिसरात ढगफुटीसारखा पाऊस झाला. वाकी तलावाच्या सांडव्यावरुन बाहेर आलेल्या पाण्याने कमालीचे नुकसान झाले आहे. 

वाकीच्या तलावात काही दिवसांपूर्वीच पाणी भरुन घेण्यात आले होते, कालच्या पावसाने आसपासच्या भागातील सगळे पाणी या तलावात आल्याने सांडव्यावरुन तीन फूटांहून अधिक उंचीसह पाणी वाहत होते, त्या मुळे या पाण्याने थेट वडगाव निंबाळकर पर्यंत येत घरांसह शेतीचे मोठे नुकसान केले आहे. 
ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

उपविभागीय अधिकारी दादासाहेब कांबळे, तहसिलदार विजय पाटील, पाटबंधारे विभागाचे अभियंता प्रवीण घोरपडे, वडगावचे सहायक पोलिस निरिक्षक सोमनाथ लांडे, संभाजी होळकर यांनी पहाटे दोन वाजल्यापासून सकाळी सातपर्यंत प्रत्येक ठिकाणी भेट देत पाहणी केली. 

या पावसाने तालुक्याच्या अनेक भागातील नाले, ओढे, बंधारे तुडुंब भरले असून अनेक ठिकाणी पिकांचेही मोठे नुकसान झाले आहे. दरम्यान उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीही आज पहाटे फोनवरुन नुकसानीची माहिती घेतली असून आवश्यक उपाययोजना करण्याचे निर्देश अधिका-यांना दिल्याचे संभाजी होळकर यांनी सांगितले. 

जगभरातील इतर बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

आज पहाटे दीपककाका कोकरे यांचा जेसीबी आणून पाण्याला जागा करुन दिल्यानंतर पाणी ओसरले. ढोलेवस्ती, निंबाळकरवस्ती, आगमवस्ती, मारुती मंदीर या भागात पाण्याने नुकसान झाले आहे. रात्री पावसाने काही ठिकाणची वाहतूकही विस्कळीत झाली होती. 

बारामतीलाही तडाखा...
रात्री दहाच्या सुमारास बारामती शहरालाही मुसळधार पावसाने तडाखा दिला.  एकीकडे मुसळधार पाऊस व दुसरीकडे विजांचे तांडव या मुळे लोक भयभीत झाले होते.