पुणे : महाजनादेश यात्रेच्या निमित्ताने उफाळून आली भाजपमधील गटबाजी

विठ्ठल तांबे
रविवार, 15 सप्टेंबर 2019

पुणे : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची महाजनादेश यात्रा, काल आणि आज, पुण्यात होती. आज, खडकवासला मतदार संघात प्रवेश करताना भाजपमधील अंतर्गत गटबाजी चव्हाट्यावर आली.

पुणे : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची महाजनादेश यात्रा, काल आणि आज, पुण्यात होती. आज, खडकवासला मतदार संघात प्रवेश करताना भाजपमधील अंतर्गत गटबाजी चव्हाट्यावर आली. मुख्यमंत्री फडणवीस यांच्या स्वागतासाठी उभारण्यात आलेले फलक आणि स्वागत कक्षांमधून ही गटबाजी उघड झाली. विधानसभा निवडणुकीत उमेदवारी मिळवण्यासाठीच हा प्रकार सुरू होता, अशी चर्चा सध्या खडकवासल्यात सुरू आहे.

आणखी वाचा : पुण्यात महाजनादेश यात्रेसाठी झाडे तोडली; मुख्यमंत्री बोलले पण, जावडेकरांचे मौन

नेत्यांच्या वेगळ्या चुली
खडकवासला मतदारसंघात सिंहगड रस्त्यावर भारतीय जनता पक्षाच्या महाजनादेश यात्रेचे सिंहगड रस्तावर माणिक बाग, गोयल गंगा चौक, फन टाईम थेटर, वडगाव फाटा, वीर बाजी पासलकर चौक खडकवासला मतदारसंघात मोठ्या जल्लोषात स्वागत करण्यात आले. मात्र यावेळी एकाच रस्त्यावर एक किमी अंतरावर पाच वेगवेगळ्या ठिकाणी स्वागता कक्षामुळे भाजपमधील अंतर्गत गटबाजी निदर्शनास आली. मोठ मोठे फ्लेक्स लावून इच्छुकांनी वेगवेगळ्या चुली मांडल्याचे समोर आले.

आणखी वाचा : पुण्यात भाजप पदाधिकाऱ्यांचा उतावीळपणा अन मुख्यमंत्र्यांचा संताप 

गवेगळे स्वागत कक्ष
वडगाव भागातील माणिकबाग, गोयल गंगा चौक, फन टाईम थेटर, वडगाव फाटा, वीर बाजी पासलकर पुलाकडे जाताना खडकवासला अध्यक्ष व युवक अध्यक्ष अरुण राजवाडे, सचिनव मोरे, इच्छुक उमेदवार सुनील मारणे, हेमंत दांगट तसेच नगरसेवक हरिदास चरवड यांनी मुख्यमंत्र्याचे स्वागत केले. या वेळी आमदार भीमराव तापकीर आणि सुनील मारणे, हेमंत दांगट यांच्यातील गटबाजी झलक तसेच सुनील मारणे आणि हेमंत दांगट यांनी स्वतंत्र स्वागत कक्ष उभारून अनपेक्षित धक्का दिल्याची चर्चा खडकवासला मतदारसंघात राजकीय वर्तुळात रंगली.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: cm devendra fadnavis maha janadesh rally at pune local leaders individual banners khadakwasla