
पुणे : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे पुण्यातील मानाचे गणपती आणि भाजप पदाधिकाऱ्यांच्या गणेश मंडळांना भेटी देण्यासाठी सोमवारी (ता. १) पुणे दौऱ्यावर येण्याची शक्यता आहे. त्यामुळे राजकीय पदाधिकारी तयारीला लागलेले आहेत. या दौऱ्यात सिंहगड रस्त्याच्या उड्डाणपुलाचे उद्घाटन होणार की नाही, याबाबत स्पष्टता आलेली नाही.