
पुणे : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सोमवारी पुण्याचा धावता दौरा केला. जेमतेम तीन तासाच्या या दौऱ्यात दोन उद्घाटने आणि आठ मंडळांना भेटी देऊन त्यांनी श्री गणेशाचे दर्शन घेतले. सर्वांना सुख, समाधान, आरोग्य, ऐश्वर्य द्यावे, सर्वांच्या मनोकामना पूर्ण व्हाव्यात, सर्वांना सुबुद्धी देवो, सन्मार्गाने चालण्याची प्रेरणा देवो, अशी प्रार्थना त्यांनी या दौऱ्यात श्री गणेशाकडे केली.