
MP Dr. Amol Kolhe consoles the family of leopard victim Shivanya in Junnar, criticizing CM for not visiting the grieving family.
Sakal
टाकळी हाजी: दहा दिवसांच्या अंतरात अत्यंत दुर्दैवी घटना घडल्या असून बिबट्याच्या हल्ल्यात पिंपरखेड व कुमशेत येथील दोन चिमुकल्यांना आपला जीव गमवावा लागला आहे. यावर ठोस उपाययोजना करण्यासाठी व कृती आराखडा तयार करण्याकरिता बैठक लावण्यासाठी वारंवार पत्र लिहून झाले आहेत. परंतु दुर्दैव आहे की, मुख्यमंत्र्यांना कबुतरांसाठी वेळ देता येतो, परंतु आमच्या लेकरांसाठी मुख्यमंत्री वेळ देऊ शकत नाही. अशी खंत शिरूर लोकसभा मतदारसंघाचे खासदार डॉ.अमोल कोल्हे यांनी व्यक्त केली.