vijay wadettiwar
sakal
पुणे: राज्यात आरक्षणाच्या मुद्यावर ‘अशी ही बनवाबनवी’ चित्रपट सुरू असून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मराठा व ओबीसी समाजाची ‘बनवाबनवी’ करत आहेत, अशी उपरोधिक टीका काँग्रेसचे ज्येष्ठ नेते विजय वडेट्टीवार यांनी रविवारी केली. त्या विरोधात रस्त्यावर आणि न्यायालयीन लढाई लढण्याचा निर्धार आम्ही केला असून, महायुतीमधील मंत्री छगन भुजबळ यांच्याशीदेखील चर्चा करीत आहोत, असेही ते म्हणाले.