‘पीएमआरडीए’च्या प्रकल्पांचा मुख्यमंत्र्यांनी घेतला आढावा

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 25 जानेवारी 2020

चार टप्प्यांत अंमलबजावणी
सर्वंकष वाहतूक आराखड्याची चार टप्प्यांत अंमलबजावणी केली जाणार आहे. तातडीच्या उपाययोजनांमध्ये पहिल्या तीन मेट्रो मार्गिका कार्यरत करण्यात येणार आहेत. बैठकीत मेट्रोसाठी भूसंपादन, वर्तुळाकार बाह्यवळण रस्ता, पाणीपुरवठा योजना आदींबाबत आढावा घेतला.

पुणे - शहरात सध्या चारचाकी आणि दुचाकी वाहनांचा वापर ७१ टक्के असून, तो सार्वजनिक वाहतूक सुविधांच्या माध्यमातून कमी करण्यावर भर दिला जाणार आहे; तसेच पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने (पीएमआरडीए) हाती घेतलेल्या हिंजवडी ते शिवाजीनगर या मेट्रोचे काम तीन वर्षांत पूर्ण करण्यात येणार असल्याचे ‘पीएमआरडीए’कडून सांगण्यात आले. त्यावर आहे त्या प्रकल्पांचे काम जलद गतीने मार्गी लावा. शासन सहकार्य करेल, असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सांगितले. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

मुख्यमंत्री ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयात ‘पीएमआरडीए’ची बैठक झाली. या वेळी उपमुख्यमंत्री अजित पवार, नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे, राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे, नगरविकास विभागाचे अपर मुख्य सचिव नितीन करीर, मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव विकास खारगे, ‘पीएमआरडीए’चे आयुक्त विक्रम कुमार, महानगर नियोजनकार विवेक खरवडकर उपस्थित होते. या बैठकीत पुणे महानगर परिसराचा सर्वंकष वाहतूक आराखडा मांडण्यात आला. 

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: CM reviews project of PMRDA