
सीरम इन्स्टिट्यूटला गुरुवारी दुपारी दीडच्या सुमारास आग लागली. यामध्ये 5 जणांचा होरपळून मृत्यू झाला आहे.
पुणे : सिरम इन्स्टिट्यूटच्या इमारतीला लागलेली आग आटोक्यात आणण्याचे प्रयत्न सुरू आहेत. सद्यस्थितीत तेथील कोरोना प्रतिबंधक लसनिर्मितीचा प्रकल्प सुरक्षित आहे. तसेच, या दुर्घटनेच्या सखोल चौकशीचे निर्देश देण्यात आल्याची माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली.
उपमुख्यमंत्री पवार हे गुरुवारी (ता.२१) सायंकाळी साडेसात वाजता सिरम इन्स्टिट्यूटला भेट देणार आहेत. दरम्यान, उपमुख्यमंत्री कार्यालयाच्या वतीने याबाबत पत्रक जारी करण्यात आले आहे. सिरम इन्स्टिट्यूटच्या इमारतीला लागलेली आग आटोक्यात आणण्यासाठी युद्धपातळीवर प्रयत्न सुरू आहेत. शहर आणि जिल्हा प्रशासनाच्या सर्व संबंधित यंत्रणा आग आटोक्यात आणण्यासाठी आणि मदत कार्यात सहभागी आहेत.
- Serun Institute Fire: सीरमच्या आगीतील मृतांची ओळख पटली; दोघे पुण्याचे
पुण्याच्या विभागीाय आयुक्तांकडून याबाबत माहिती घेतली असून, दुर्घटनेच्या सखोल चौकशीचे निर्देश देण्यात आले आहेत. प्रकल्पाच्या सुरक्षिततेबाबत देशातून आणि देशाबाहेरही चिंता व्यक्त करण्यात येत आहे. कोरोना प्रतिबंधक लसनिर्मितीचा प्रकल्प सुरक्षित असल्याचे मला सांगण्यात आले आहे. सद्यस्थितीत आग आटोक्यात आणून दुर्घटनेमुळे होणारी हानी नियंत्रित ठेवण्यास प्राधान्य देण्यात येत आहे, असे पवार यांनी सांगितले.
- काँग्रेस शोधतेय राहुल गांधींना पर्याय; अध्यक्षपदाच्या शर्यतीत ज्येष्ठ नेता
मुख्यमंत्री शुक्रवारी घटनास्थळी भेट देणार
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आगीच्या दुर्घटनेबाबत सिरम इन्स्टिट्यूटचे अदर पुनावाला यांच्याशी चर्चा केली आहे. शुक्रवारी (ता. 22) दुपारी साडेतीन वाजता पुणे येथे सिरम इन्स्टिट्यूटच्या प्रत्यक्ष आग लागलेल्या युनिटच्या ठिकाणी भेट देऊन पाहणी करणार आहेत.
Chief Minister Uddhav Thackeray will visit the unit of Serum Institute of India in Manjri, Pune, where the fire mishap took place, to inspect & take stock of the situation tomorrow at noon: Office of the Chief Minister of Maharashtra
— ANI (@ANI) January 21, 2021
- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा
(Edited by: Ashish N. Kadam)