CNG PNG Rate Increase : सीएनजी’, ‘पीएनजी’च्या दरात वाढ; ‘सीएनजी’ प्रतिकिलो ९९ रुपये, तर......

पुणे परिसरात ‘कॉम्प्रेस्ड नॅचरल गॅस’च्या (सीएनजी) दरात प्रतिकिलो सव्वा रुपयांची, तर घरगुती ‘पाइप नॅचरल गॅस’च्या (पीएनजी) दरात प्रतिमानक घनमीटर दीड रुपयांची वाढ करण्यात आली आहे.
CNG-PNG Price Increase

CNG-PNG Price Increase

Sakal
Updated on: 

पुणे - पुणे परिसरात ‘कॉम्प्रेस्ड नॅचरल गॅस’च्या (सीएनजी) दरात प्रतिकिलो सव्वा रुपयांची, तर घरगुती ‘पाइप नॅचरल गॅस’च्या (पीएनजी) दरात प्रतिमानक घनमीटर दीड रुपयांची वाढ करण्यात आली आहे. त्यामुळे पुणे, पिंपरी-चिंचवडसह चाकण, तळेगाव आणि हिंजवडी परिसरात ‘सीएनजी’चा नवा दर ९९ रुपये प्रतिकिलो, तर घरगुती ‘पीएनजी’चा दर ५३ रुपये प्रतिमानक घनमीटर झाला आहे. हे नवे दर गुरुवारी मध्यरात्रीपासून लागू करण्यात आले आहेत.

Loading content, please wait...