Pune CNG: पुण्यातील सी एन जी पंप 1 ऑक्टोबरला बंद राहणार | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Pune CNG: पुण्यातील सी एन जी पंप 1 ऑक्टोबरला बंद राहणार

Pune CNG: पुण्यातील सी एन जी पंप 1 ऑक्टोबरला बंद राहणार

पुणेकरांसाठी महत्वाची बातमी आहे. शहरातील CNG पंप १ ऑक्टोबर 2022 रोजी बंद राहणार आहेत. पुण्यात CNG वर मोठ्या प्रमाणात वाहने रिक्षा चालतात. पुण्यातील सार्वजनिक वाहतूकीवर याचा मोठा परिणाम होण्याची शक्यता आहे. पेट्रोलियम मंत्रालयाच्या परिपत्रकानुसार CNG च्या ट्रेड डीलर मार्जिनमध्ये वाढ व्हावी अशी मागणी करण्यात आली आहे.

पुण्यातील टॉरेंट गॅस पंपांवर १ ऑक्टोबरला CNG ची विक्री होणार नसल्याची माहिती समोर आली आहे. कारण पेट्रोलियम मंत्रालयाच्या परिपत्रकानुसार CNG च्या ट्रेड डीलर मार्जिनमध्ये वाढ व्हावी अशी मागणी करण्यात आली आहे. पुणे शहरात 60 पेक्षा जास्त सी एन जी पंप आहेत.

पुण्यात सध्या मोठ्या प्रमाणात वाहने सीएनजीवरील आहेत. त्यामुळे पुणेकरांची गैरसोय होणार आहे. त्याचबरोबर महापालिकेने सीएनजीवरील पीएमपीएलच्या बसही आणलेल्या आहेत. त्यामुळे पीएमपीएल वाहतुकीवरही याचा परिणाम होण्याची शक्यता आहे.

Web Title: Cng Pumps In Pune City Will Be Closed 1 October

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
टॅग्स :punecngCNG Gas