अंगठ्याच्या ठशावर "सीएनजी'चे पेमेंट

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 26 जानेवारी 2017

पुणे - डेबिट किंवा क्रेडिट कार्ड जवळ नाही... चिंता करू नका... तुमचा "आधार' क्रमांक बॅंक खात्याशी संलग्नित करा आणि हाताच्या अंगठ्याचा ठसा उमटून मायक्रो एटीएमद्वारे तुम्ही पैसे भरू किंवा काढूही शकता. तसेच सीएनजी गॅसदेखील भरून घेऊ शकता. शिवाजीनगर येथील साखर संकुलसमोरील महाराष्ट्र नॅचरल गॅस कंपनीच्या (एमएनजीएल) पंपावर बुधवारपासून (ता.24) रिक्षाचालकांसाठी ही सुविधा कार्यान्वित करण्यात आली आहे.

"एमएनजीएल'ने आयडीएफसी बॅंकेच्या सहकार्यातून सुरू केलेल्या या सेवेचे प्रारंभ डॉ. बाबा आढाव यांच्या हस्ते झाला. कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक ए. एम. तांबेकर, नितीन पवार उपस्थित होते. ""नागरिकांनीही नव्या गरजा लक्षात घेऊन आधुनिकतेचे स्वागत करावे,'' असे आवाहन डॉ. आढाव यांनी केले. तांबेकर म्हणाले, ""पुणे व पिंपरी चिंचवड येथे "एमएनजीएल'चे 41 पंप आहेत. तेथे टप्प्याटप्प्याने ही सुविधा सुरू करण्याचा कंपनीचा प्रयत्न आहे.''

सीएनजी भरताना आधार क्रमांक सांगून मायक्रो एटीएमद्वारे रिक्षाचालक पैसे भरू शकतात. या सुविधेसाठी कोणतेही शुल्क नाहीत. परिणामी, सुटे पैसेही सोबत बाळगण्याची आवश्‍यकता नाही. ज्या रिक्षाचालकांच्या खात्यात रक्कम शिल्लक (बॅलन्स) असेल, त्यांनाच या सुविधेचा लाभ घेता येईल.

Web Title: CNG's thumb payment