'भाजपकडून सहकारी बॅंकांबाबत दुजाभाव'

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 12 ऑगस्ट 2018

इंदापूर - अच्छे दिनचे स्वप्न दाखवून सत्तेवर आलेले भाजपचे सरकार सहकारी व राष्ट्रीयीकृत बॅंकांना वेगवेगळा न्याय लावत आहे. मराठा, धनगर, मुस्लिम व लिंगायत आरक्षणाबाबत सरकारचे धोरण वेळकाढूपणाचे आहे. हे सरकार शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी व आधारभूत किंमत देत नसल्याने अराजकतेची स्थिती निर्माण झाली आहे. यासाठी आगामी काळात आपल्या विचाराचे सरकार निवडून आणणे गरजेचे आहे, असे प्रतिपादन माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले.

 दि बारामती सहकारी बॅंकेच्या इंदापूर शाखेच्या रौप्यमहोत्सवी कार्यक्रमात ते बोलत होते. आमदार दत्तात्रेय भरणे, राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष प्रदीप गारटकर या वेळी उपस्थित होते. या वेळी अखिल भारतीय हिंदू खाटीक समाजाच्या प्रदेश उपाध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल बॅंकेचे संचालक विजय गालिंदे यांचा सत्कार करण्यात आला. या वेळी काही सभासदांनी कर्जाच्या व्याजदरात कपातीची मागणी केली. 

इंदापूर शाखेचे माजी शाखाधिकारी श्रीकृष्ण जाधव व विद्यमान शाखाधिकारी प्रशांत शिर्के यांच्या कामाचे, तसेच बॅंकेच्या वाटचालीबद्दल पवार यांनी कौतुकोद्‌गार काढले.

पवार म्हणाले, की भाजप सरकारने राष्ट्रीयीकृत बॅंकांना ८८ हजार कोटी रुपयांची मदत केली. मात्र, ग्रामीण भागाचे आर्थिक परिवर्तन करणाऱ्या सहकारी बॅंकांना अडचणीत आणण्याचा प्रयत्न केला. सहकार मोडीत काढण्याचा प्रयत्न सरकार करत आहे. भरणे म्हणाले, की बॅंक लेखा परीक्षणात सातत्याने अ वर्ग मिळवत आहे. भिगवण शाखेच्या ठेवी ५० कोटी रुपयांच्या असून, २५ कोटी रुपयांचे कर्जवाटप केले आहे. 

Web Title: Co-operative Bank of Baramati Indapur branch of the silver jubilee