जुन्नर : जुन्नर तालुक्यात महाविद्यालयात बेकायदेशीर सुरू असलेल्या इंटिग्रेटेड क्लास विरोधात जुन्नरच्या क्लास चालकांनी आज गुरुवारी ता.19 रोजी एक दिवसाचा लाक्षणिक बंद पुकारला.
राज्यात महाविद्यालयात सुरू असलेले इंटीग्रेटेड क्लासेस बंद करण्याची घोषणा शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी नागपूर अधिवेशनात नुकतीच केली. अशा प्रकारे इंटीग्रेटेड क्लासेस महाविद्यालयात सुरु असतील तर त्या महाविद्यालयांची शासन मान्यता काढून घेण्यात येईल अशी घोषणा त्यांनी विधानसभेत केली. मात्र जुन्नर तालुक्यातील जुन्नर, नारायणगाव, आळेफाटा येथील विविध महाविद्यालयातून हजारो रुपये शुल्क घेऊन ईटीग्रेटेड क्लासेस सुरु आहेत. महाविद्यालयांतून सुरु असलेल्या इंटीग्रेटेड क्लासेसवर त्वरीत कारवाई करुन हे क्लासेस बंद करावेत. अन्यथा संबंधित महाविद्यालयांची मान्यता काढून घ्यावी अशी मागणी लाक्षणिक बंदच्या वेळी करण्यात आली. जुन्नर तालुक्यातील विद्या कोचिंग, सायन्स अॅकॅडमी, प्रज्ञा नॉलेज हब चे क्लाससंचालक यावेळी उपस्थित होते.
राज्यातील विविध ठिकाणच्या क्लासेस संघटना या बंदमध्ये सहभागी झाल्या असून नागपूर येथे एक दिवसीय धरणे आंदोलन करण्यात आले आहे. प्रोफेशनल टीचर्स असोसिएशन(महाराष्ट्र राज्य), महाराष्ट्र क्लास ओनर्स असोसिएशन मुंबई, कोचिंग क्लासेस संघटना ठाणे, तसेच असोसिएशन ऑफ कोचिंग इन्स्टिट्यूट, नागपूर या संघटनांकडून हा एक दिवसीय बंद आयोजित करण्यात आला आहे.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.