
पुण्यातून एक खळबळजनक घटना समोर आली आहे. एका महिलेच्या सूपमध्ये झुरळ सापडल्याची घटना घडली आहे. पुण्यातील कॅम्प परिसरातील "भिवंडी दरबार" हॉटेलमधून हा किळसवाणा प्रकार समोर आला आहे. या घटनेनंतर अन्न आणि औषध प्रशासनाच्या अहवालानंतर हॉटेलवर कारवाई करण्यात आली आहे. या प्रकरणी हॉटेलच्या मालकासह व्यवस्थापकाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.