Youth Agitation Over Exam Leaks: CJP Mobilizes Protest at Savitribai Phule Pune University
Sakal
पुणे : ‘नीट’, सीबीएसईसह अन्य परीक्षांच्या पेपरफुटी प्रकरणांमुळे देशभरातील एक कोटीहून अधिक विद्यार्थ्यांचे नुकसान झाले असून त्यांचे भविष्य अंधारात सापडले आहे. या अन्यायाविरोधात आवाज उठवण्यासाठी आणि केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात उद्या (ता. ११) दुपारी ४ वाजल्यापासून आंदोलन करण्यात येणार आहे, अशी माहिती ‘कॉकरोच जनता पार्टी’चे संस्थापक अभिजित दिपके यांनी दिली.