राज्यात थंडी वाढली

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 29 नोव्हेंबर 2018

पुणे - किमान तापमानात होत असलेल्या घसरणीमुळे राज्यात थंडी वाढली आहे. अनेक भागांत पहाटेच्या वेळी धुक्‍याची दुलई पसरू लागली आहे. नगर येथे किमान तापमानात सरासरीच्या तुलनेत तब्बल चार अंश सेल्सिअसने घट होत पारा 10 अंश सेल्सिअसवर आला आहे.

पुढील दोन दिवसांमध्ये राज्याच्या तापमानात घट होणार असून, मुख्यत: कोरड्या हवामानाचा अंदाज वर्तविण्यात आला आहे. गेल्या आठवड्यात पावसाला पोषक हवामान असल्याने राज्याच्या तापमानात वाढ झाली होती. मात्र ही स्थिती निवळून जाताच राज्याचे तापमान सरासरीच्या खाली येण्यास सुरवात झाली. यातच उत्तरेकडून येत असलेल्या गार वाऱ्याच्या शिरकावामुळे गेल्या तीन ते चार दिवसांपासून राज्याच्या किमान तापमानात वेगाने घट होत आहे. मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भासह कोकणातही अनेक ठिकाणी तापमान सरासरीपेक्षा 1 ते 3 अंश सेल्सिअसने कमी झाले आहे. औरंगाबाद, पुणे, नाशिक आणि नागपूर येथेही गारठा वाढला आहे.

Web Title: Cold Increase in State