थंड वाऱ्यामुळे गारठा वाढला 

थंड वाऱ्यामुळे गारठा वाढला 

पुणे - शहरात गेल्या दोन दिवसांपासून रात्री गारठा वाढला आहे. या दोन दिवसांमध्ये किमान तापमानाचा पारा ५.३ अंश सेल्सिअसने खाली घसरला आहे. शहरात गुरुवारी सकाळपर्यंत किमान तापमान १२.२ अंश सेल्सिअस नोंदले गेले. 

उत्तर भारतात अद्यापही हिमवर्षाव सुरू आहे. तेथून येणाऱ्या थंड आणि कोरड्या वाऱ्याचा प्रभाव पुण्यासह राज्याच्या विविध भागांत जाणवत आहे. त्यामुळे बहुतांश शहरांतील किमान तापमान सरासरीपेक्षा एक ते पाच अंश सेल्सिअसपर्यंत कमी झाल्याचे निरीक्षण हवामान खात्यातर्फे नोंदविण्यात आले आहे. 

फाल्गुन महिना सुरू झाल्यानंतर थंडीचा प्रभाव कमी होऊन उन्हाचा चटका वाढतो. मात्र फाल्गुनच्या पहिल्याच दिवशी पुण्यात गेल्या सहा दिवसांमधील सर्वांत नीचांकी किमान तापमान नोंदले गेले. शहरात १ मार्चला १२ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली होती. त्यानंतर सातत्याने वाढत जाणारे किमान तापमान ५ मार्चला १७.५ अंश सेल्सिअसपर्यंत वाढले होते. पण त्यानंतर उत्तरेकडील वाऱ्याचा प्रभाव वाढल्याने गुरुवारी सकाळपर्यंत १२.२ अंश सेल्सिअस तापमान नोंदले गेले.

शहरात गेल्या सहा दिवसांपासून कमाल तापमान सातत्याने कमी होत आहे. बुधवारच्या तुलनेत गुरुवारी कमाल तापमान ३.३ अंश सेल्सिअसने वाढून ३४.४ अंश सेल्सिअसची नोंद झाली. मात्र, किमान तापमान बुधवारच्या तुलनेत ३.३ अंश सेल्सिअसने घसरले. त्यामुळे दिवसा उन्हाचा चटका आणि रात्री गारठा, असे विषम वातावरण पुणेकर सध्या अनुभवत आहेत. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com