पारा पुन्हा उतरू लागला 

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 20 जानेवारी 2017

पुणे - शहर आणि परिसरात असलेले ढगाळ वातावरण कमी झाले असून, पुढील आठवड्यात आकाश निरभ्र राहण्याची शक्‍यता हवामान खात्याने व्यक्त केली. त्यामुळे सरासरीपेक्षा वाढलेला किमान तापमानाचा पारा पुढील तीन दिवसांमध्ये सरासरीपर्यंत खाली येईल, असेही खात्याने सांगितले आहे. पुण्यात 11.8 अंश सेल्सिअस किमान तापमान नोंदले गेले. राज्यात सर्वांत कमी तापमानाची नोंद उस्मानाबाद येथे 10.5 अंश सेल्सिअस झाली. 

उत्तर भारतात थंडीची लाट पसरली आहे. तेथून महाराष्ट्राच्या दिशेने येणाऱ्या थंड वाऱ्याच्या प्रभावामुळे राज्यात कडाक्‍याची थंडी पडली होती. त्यानंतर समुद्रावर येणारे बाष्पयुक्त वारे आणि उत्तरेतून येणारे थंड वारे महाराष्ट्रावर एकत्र येत होते. त्यामुळे राज्यात ढगाळ वातावरण निर्माण झाले होते. त्याचा थेट 

परिणाम थंडी कमी होण्यावर झाला होता. हे ढगाळ वातावरण गुरुवारपासून निवळत आहे. त्यामुळे शहर आणि परिसरातील गारठा गुरुवारी रात्री वाढला होता. 

पुढील आठवड्यात आकाश निरभ्र राहणार असल्याने शहर आणि परिसरात गारठा जाणवेल, असा अंदाज हवामान खात्याने व्यक्त केला आहे. 

मध्य महाराष्ट्राच्या काही भागात किमान तापमानात सरासरीच्या तुलनेत किंचित वाढ झाली. विदर्भातही थंडीचा कडाका कमी झाला असून, किमान तापमान सरासरीच्या जवळ होते.

Web Title: cold weather