pune cold
sakal
- प्रज्वल रामटेके
पुणे - पुण्यात यंदा हुडहुडी वाढली असून डिसेंबर महिन्याने थंडीचे गेल्या १० वर्षांतील सर्व विक्रम मोडीत काढले आहेत. डिसेंबरच्या अवघ्या २३ दिवसांतच तब्बल १३ दिवस किमान तापमानाची नोंद ‘एक’ अंकी झाली आहे. गेल्या १० वर्षांतील हा एक विक्रम ठरला आहे. २०१४ पासूनची आकडेवारी पाहता यंदाचा डिसेंबर सर्वाधिक थंड असल्याचे निरीक्षण नोंदविण्यात आले आहे.