वही, पेन संकलनाने बाबासाहेबांना अभिवादन

रमेश मोरे 
मंगळवार, 3 एप्रिल 2018

जुनी सांगवी (पुणे) : डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या १२७ व्या जयंती निमित्त अभिवादनासाठी हार, फुले, मेणबत्तीऐवजी वही, पेन संकलित करून संकलित झालेले साहित्य ग्रामिण भागातील गरजू विद्यार्थ्यांना पिंपरी चिंचवड वही, पेन संकलन व वितरण समितीच्या वतीने वाटप केले जाते. या निमित्ताने येत्या १४ एप्रिल डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीदिनी अभिवादनासाठी हार, फुले, मेणबत्ती न आणता त्या ऐवजी एक वही व एक पेन द्यावा, असे आवाहन पिंपरी चिंचवड शहर वही पेन संकलन समितीच्या वतीने करण्यात आले होते.

यास प्रतिसाद देत जुनी सांगवी येथील कै. सौ. शकुंतलाबाई  शितोळे शाळेच्या विद्यार्थ्यांनी पाचशे वही व पेनचे संकलन करून समितीच्या कार्यकारणीकडे सुपुर्द केले. यावेळी समिती अध्यक्ष डॉ. प्रविण रणसुरे म्हणाले, संकलित झालेले हे शैक्षणिक साहित्य गरजु विद्यार्थ्यांपर्यंत पोचवण्याच काम समिती करते. गरजु विद्यार्थ्यांना हे साहित्य मिळणे हेच खरे बाबासाहेबांना अभिवादन होय.

हार, फुले, मेणबत्ती आणण्याऐवजी आम्ही गेली दोन वर्षापासुन शहरी भागातुन संकलित झालेले वही पेन ग्रामीण भागातील गरजु विद्यार्थ्यांपर्यंत पोचवतो. यावेळी मुख्याध्यापक शिवाजी माने म्हणाले,परवा सकाळ मधील वही पेन संकलनाची बातमी वाचुन आम्ही विद्यार्थ्यांपर्यंत ही माहीती सांगीतली विद्यार्थ्यांनी दोन दिवसात पाचशे वही व पेनचे संकलन केले.

Web Title: collection of books pen on the occasion of babasaheb ambedkar birth anniversary