Ramayana: अनोख्या रुपात सादर होतंय 'वाल्मिकी रामायण'; दीड लाखांहून अधिक किंमत

अनेक वैशिष्ट्यांनी भरलेला या ग्रंथाच्या निर्मितीसाठी ५ वर्षांचा कालावधी लागला
Valmiki Ramayana
Valmiki Ramayana
Updated on

पुणे : भारतीय परंपरेत अतिशय महत्वाचे स्थान असलेले ‘वाल्मिकी रामायण’ हे आतापर्यंत पुस्तक, गाणी, दृकश्राव्य, टीव्ही मालिका, नाटक, चित्रपट, अॅनिमेशन अशा विविध रुपात आपल्या समोर आले आहे. परंतु आता प्रथमच हे 'वाल्मिकी रामायण' एका अनोख्या पुस्तक संचाच्या रुपात आपल्यासमोर येत आहे. (collection of Valmiki Ramayana in a unique form Price more than one lakhs)

Valmiki Ramayana
Cabinet Decision: दिव्यांगांना पदोन्नती आरक्षण ते शेतकऱ्यांना दिवसभर वीज; मंत्रिमंडळाचे निर्णय जाणून घ्या

वैशिष्ट्ये जाणून आश्चर्यचकित व्हाल

दहा पुस्तकांचा संच असलेल्या या ग्रंथाच्या निर्मितीसाठी पर्यावरणपूरक आणि उच्च प्रतीच्या साधनांचा वापर करण्यात आला आहे. त्याचबरोबर पुस्तक संचासाठी डिझाईन करण्यात आलेला विशेष लाकडी बॉक्स, रामायणातील महत्वाच्या प्रसंगावर आधारित २०० हून अधिक उत्कृष्ट चित्रे आणि मौल्यवान स्वरोस्की क्रिस्टल्सची सजावट ही या ग्रंथाची काही महत्वाची वैशिष्ट्ये आहेत, अशी माहिती वेदिक कॉसमॉस प्रकाशन संस्थेचे हेमंत शेठ यांनी दिली. महत्वाचे म्हणजे या अनोख्या रामायणाची किंमत भारतात तब्बल १.६५ लाख रुपये इतकी असून परदेशात ती २,५०० अमेरिकी डॉलर्स इतकी असणार आहे.

Valmiki Ramayana
Rapper Shubham Jadhav: "गाण्यात समाजाचं प्रतिबिंब, त्यामुळं चिडायची गरज नाही"; रॅपर शुभमनं मांडली भूमिका

शुक्रवारी प्रकाशन सोहळा

या विशेष रुपात सादर होणाऱ्या रामायणाचे प्रकाशन भारतात पहिल्यांदाच पुणे शहरात होणार आहे. या ग्रथांच्या संचाचा प्रकाशन सोहळा शुक्रवार, २१ एप्रिल रोजी सायं ५ वाजता कोथरूड येथील एमआयटी विश्वशांती विद्यापीठाच्या संत ज्ञानेश्वर सभागृह येथे संपन्न होणार आहे. श्री रामजन्मभूमी न्यासाचे खजिनदार स्वामी गोविंददेव गिरी महाराज यांच्या हस्ते आणि एमआयटी विश्वशांती विद्यापीठाचे संस्थापक डॉ. विश्वनाथ कराड यांच्या प्रमुख उपस्थितीत या अनोख्या रामायणाचे प्रकाशन होईल. पुण्यातील व्हिनस ट्रेडर्सच्या सर्व शाखांमध्ये हा ग्रंथ उपलब्ध असेल.

वेदिक कॉसमॉस प्रकाशन संस्थेने तयार केलेले अनोखे वाल्मिकी रामायण दाखविताना फोटोत (डावीकडून) सुरेंद्र करमचंदानी, भारती झवेरी आणि हेमंत शेठ
वेदिक कॉसमॉस प्रकाशन संस्थेने तयार केलेले अनोखे वाल्मिकी रामायण दाखविताना फोटोत (डावीकडून) सुरेंद्र करमचंदानी, भारती झवेरी आणि हेमंत शेठ
Valmiki Ramayana
Satyapal Malik: पुलवामाबाबतच्या खुलाशानंतर शहिदांच्या कुटुंबियांच्या तीव्र प्रतिक्रिया; केली 'ही' मोठी मागणी

ग्रंथ निर्मितीसाठी लागली पाच वर्षे

या ग्रंथाबाबत माहिती देताना हेमंत शेठ म्हणाले, “वाल्मिकी रामायणाच्या सात खंडातील २४,००० मूळ संस्कृत श्लोकांबरोबरच हिंदी आणि इंग्रजीतील भाषांतर देखील देण्यात आले आहे. ही पुस्तके पाम वृक्षाच्या पानापासून प्रेरित असून, ग्रंथाचे मुखपृष्ठ हे स्वरोस्की क्रिस्टल्सने सजवण्यात आले आहे. त्याचबरोबर त्याला सुरेख काठ देखील आहेत. हे रामायण संग्रहित करण्यासाठी अक्रोड, मेपल आणि सेपिल या तीन वृक्षांच्या लाकडाचा वापर करून हाताने तयार केलेल्या एका विशेष बॉक्सचा वापर करण्यात आला आहे. तसेच यामध्ये रामायणातील महत्वाच्या प्रसंगावर आधारित २०० हून अधिक उत्कृष्ट चित्रांचा अंतर्भाव करण्यात आला असून ही चित्रे मौल्यवान स्वरोस्की क्रिस्टल्स वापरून अधिक देखणी करण्याचा प्रयत्न केला गेला आहे. या ग्रंथाच्या निर्मितीसाठी ५ वर्षे इतका कालावधी लागला असून, पहिल्या टप्प्यात ३ हजार प्रती छापल्या जाणार आहेत. या ग्रंथाचे एकूण वजन (बॉक्स सहित) ४५ किलो इतके आहे"

Valmiki Ramayana
Weather Updates: नागरिकांना उकाड्यापासून मिळणार दिलासा! तापमानात होणार मोठी घट - IMD

ग्रंथ बांधणीचं पर्यावरण पूरक साहित्य

या पुस्तकासाठी फॉरेस्ट स्टुवर्डशिप कौन्सिल (एफएससी) या जागतिक दर्जाच्या संस्थेने प्रमाणित केलेला पर्यावरणपूरक कागद आणि खास नैसर्गिक घटकांच्या वापरातून तयार करण्यात आलेली शाई वापरण्यात आली आहे. त्याचबरोबर सदर ग्रंथाच्या निर्मितीत अत्यंत महत्वाचा भाग असेलेला ग्लू अर्थात डिंक किंवा खळ ही देखील पूर्णतः रसायने विरहित असून फक्त नैसर्गिक साहित्याच्या वापरातूनच तयार करण्यात आली आहे. सदर खळ ही जर्मनी येथून मागवण्यात आली आहे, अशी माहिती वेदिक कॉसमॉस प्रकाशन संस्थेच्या भारती झवेरी यांनी दिली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com