शहर पातळीवर हवे सामूहिक नेतृत्व - अनिल भोसले

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 23 नोव्हेंबर 2016

पुणे - 'शहर पातळीवर पक्षात सर्वांना एकत्र घेऊन चालणारे सामूहिक नेतृत्व हवे. पक्षहितासाठी सामूहिक चर्चा महत्त्वाची असते. त्यातूनच यश मिळते,'' असे सांगत राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे आमदार अनिल भोसले यांनी पक्षाच्या शहराध्यक्षा वंदना चव्हाण यांना मंगळवारी "लक्ष्य' केले. सामूहिक नेतृत्व मिळाल्यास पक्षसंघटना मजबूत होऊन महापालिकेची आगामी निवडणूक स्वबळावर लढता येईल, असेही त्यांनी सांगितले.

विधान परिषदेच्या निवडणुकीतील विजयानंतर भोसले यांनी माध्यमांशी संवाद साधला. निवडणुकीच्या काळात पक्षाने राबविलेली प्रचारयंत्रणेची माहिती त्यांनी दिली. त्याचवेळी चव्हाण यांच्या कारभाराकडेही बोट दाखविले.

भोसले म्हणाले, 'सामूहिक नेतृत्वामुळे पक्षसंघटना मजबूत होण्यास मदत होते. त्यामुळे अशा नेतृत्वाने पक्षातील सर्वांशी चर्चा करून निर्णय घेतले पाहिजेत. स्थानिक पातळीवर तसे नेतृत्व मिळाल्यास स्वबळावर निवडणूक लढविण्याइतपत पक्ष सक्षम होईल. पालिकेच्या राजकारणात आतापर्यंत मी लक्ष घातलेले नाही. यापुढेही ते घालणार नाही; परंतु मी काही लोकांच्या आधी पक्षात आलो आहे. त्यामुळे माझी पक्षावर निष्ठा आहे.''

'निवडणुकीत कॉंग्रेस, शिवसेनेची काही मते मिळाली. मात्र, शिवसेनेच्या वरिष्ठ नेत्यांनी आदेश देऊनही काही नेत्यांनी शब्द फिरविला असून, जिल्ह्यातील शिवसेनेच्या नेत्यांनी प्रामाणिकपणे मदत केली. भाजपच्या एका वरिष्ठ नेत्यामुळे माझी काही मते कमी झाली; अन्यथा साडेपाचशेंहून अधिक मतांचा टप्पा गाठू शकलो असतो,'' असा दावा भोसले यांनी केला. कॉंग्रेसबरोबर आघाडी करण्याचा निर्णय राज्य पातळीवरील नेत्यांचा आहे, असेही ते म्हणाले.

Web Title: Collective leadership at the level of the city