'गरज पडल्यास धायरीतील विहिरी, टँकर ताब्यात घेऊ'

'गरज पडल्यास धायरीतील विहिरी, टँकर ताब्यात घेऊ'

पुणे - धायरी येथील पाणी व वीजचोरी प्रकरणात पाटबंधारे खाते आणि महावितरणकडून कारवाईस विलंब होत असताना जिल्हा प्रशासनाने याची गंभीर दखल घेतली आहे. पाणीचोरांवर कारवाई करण्याबरोबरच आवश्‍यकता वाटल्यास विहिरी आणि टॅंकरचे अधिग्रहण करण्यात येईल, असे जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी ‘सकाळ’शी बोलताना सांगितले.

धायरी येथे कालव्यास भगदाड पाडून पाइपने विहिरीत पाणी आणून त्याची टॅंकरने विक्री केली जात असल्याचा प्रकार ‘सकाळ’ने उघडकीस आणला आहे. या प्रकरणात वीजचोरीदेखील होत असल्याचे निदर्शनास आले आहे. महावितरणच्या भरारी पथकाने त्यापैकी एका पॉइंटमालकास दंडासह बिल दिले असून, गुन्हादेखील दाखल केला आहे. मात्र, दुसऱ्या पॉइंटमालकावर अद्याप कारवाई  केलेले नाही; तर ‘आपला याच्याशी काहीच संबंध नाही,’ अशा अविर्भावात पाटबंधारे खात्याकडून कोणतीही ठोस कारवाई झालेले नाही.

दरम्यान, या सर्व प्रकाराची जिल्हा प्रशासनाने गंभीर दखल घेतली असून, जिल्हाधिकाऱ्यांनी तातडीने या सर्व गोष्टींची पाहणी करण्यासाठी एक पथक पाठविले. संबंधित पथकाने त्या ठिकाणी पाहणी करून यासंदर्भात केलेला पंचनामा जिल्हाधिकाऱ्यांकडे सादर केला आहे. 

यासंदर्भात जिल्हाधिकारी म्हणाले, ‘‘पाणीचोरी होत असेल, तर संबंधितांवर कडक कारवाई करण्यात येईल. धायरी आणि परिसरातील नागरिकांना पाणी देण्याची जबाबदारी ही शासनाची आहे. आवश्‍यकता वाटल्यास संबंधित विहिरी आणि टॅंकरचे अधिग्रहण करून त्यांच्यामार्फत पाणीपुरवठा करण्यात येईल.’’

पुरावे नष्ट केल्याचे उघड
तहसीलदारांच्या पथकाने पाहणी करून सादर केलेल्या अहवालात कालव्याला भगदाड पाडून चोरी होत नसल्याचे म्हटले आहे. दरम्यान, जिल्हा प्रशासनाच्या पथकाने सोमवारी (ता. १३) पाहणी केली. त्या वेळी प्रत्यक्ष जागेवरील सर्व पुरावे नष्ट करण्यात आले होते, असेही प्रशासनातील एका अधिकाऱ्याने नाव न घेण्याच्या अटीवर सांगितले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com